Worli Accident : मिहीर शाहाच्या कबुलीने 'हिट अँड रन' प्रकरणात मोठा ट्विस्ट

मुंबई तक

10 Jul 2024 (अपडेटेड: 10 Jul 2024, 06:41 PM)

Mihir Shah Worli Hit And Run Case : मुंबई पोलिसांनी वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीची चौकशी केली, यात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मुंबई पोलिसांनी मिहीर शाह याची चौकशी केली.

मिहीर शाह याला पोलिसांनी न्यायालयसमोर हजर केले.

follow google news

बातम्या हायलाइट

point

वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपीने काय सांगितले?

point

मिहीर शाह याची मुंबई पोलिसांनी केली चौकशी

point

हिट अँड रन प्रकरणी मिहीर शाहाला पोलीस कोठडी

Worli Hit And Run : मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली. मिहीर शाह असे या आरोपीचे नाव असून, त्याला शिवडी न्यायालयात हजर करण्यापूर्वी पोलिसांनी त्याची चौकशी केली. मिहीर शाहने नेमके काय सांगितले याबद्दलची माहिती समोर आली आहे. (What did Mihir Shah told to Mumbai police about Worli hit And Run case)  

हे वाचलं का?

विरार येथून पोलिसांनी मिहीर शाह याला ९ जुलै रोजी अटक केली. त्याला बुधवारी (10 जुलै) मुंबईतील शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने मिहीर शाह याला १६ जुलै रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

मिहीर शाहाने पोलिसांना काय सांगितले?

वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याची मुंबई पोलिसांनी चौकशी केली. टीव्ही ९ वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार राजेश शाह यांनी मिहीर शाहला वाचवण्याचे प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा >> मोबाईल सुरु केला अन्...; मिहीर शाहाला पोलिसांनी कसे पकडले? 

मिहीर शाहचे वडील राजेश शाह आणि त्याच्या चालकाला पोलिसांनी अटक केली. त्यावेळी राजेश शाह यांनी सांगितले की, अपघातावेळी चालक कार चालवत होता.

हेही वाचा >> पिता-पुत्राने ट्रेनसमोर उडी मारली अन्.. हादरवून टाकणारा VIDEO 

पण, आता मिहीर शाहाची पोलिसांनी चौकशी केली. त्यात त्याने सांगितले की, अपघातावेळी मी कार चालवत होतो, अशी कबुली त्यांनी दिली. 

मिहीर शाह शाहपूरमध्ये बसला होता लपून

वरळीत अपघात झाल्यानंतर मिहीर शाह फरार झाला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, मिहीर घटना घडल्यानंतर गोरेगाव येथील त्याच्या प्रेयसीच्या घरी गेला होता. तिथे त्याची आई आणि बहीण आली. त्यानंतर ते आधी बोरिवली आणि नंतर शहापूरला गेले. शहापूरमध्ये ते एका रिसॉर्टमध्ये राहत होते.

    follow whatsapp