गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंचं वाढवलं टेन्शन; म्हणाले, ’12 खासदार, 22 माजी आमदार संपर्कात’

मुंबई तक

• 02:08 PM • 05 Jul 2022

मनीष जोग (जळगाव) जळगाव: शिवसेनेचे बंडखोर आमदार १५ दिवसांनी आपल्या मतदार संघात परतले आहेत. सुरत, गुवाहटी, गोवा असा प्रवास केल्यानंतर आमदार स्वगृही परतले आहेत. जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे आपल्या मतदार संघात परतले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aaghadi) गुलाबरावांकडे कॅबिनेट मंत्री पद […]

Mumbaitak
follow google news

मनीष जोग (जळगाव)

हे वाचलं का?

जळगाव: शिवसेनेचे बंडखोर आमदार १५ दिवसांनी आपल्या मतदार संघात परतले आहेत. सुरत, गुवाहटी, गोवा असा प्रवास केल्यानंतर आमदार स्वगृही परतले आहेत. जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे आपल्या मतदार संघात परतले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aaghadi) गुलाबरावांकडे कॅबिनेट मंत्री पद होते. त्यांनी गुवाहटीला जाण्याअगोदर उद्धव ठाकरेंनी भेट घेतली होती परंतु नंतर ते शिंदे गटात दिसल्याने सर्वांना धक्का बसला होता. काल विधानसभेच्या अधिवेशनात गुलाबरावांची तोफ धडाडली होती.

माध्यमांशी बोलताना गुलाबराव म्हणाले ” मी १५ दिवस महाराष्ट्राबाहेर होतो, राज्यातील घटना पाहता मी वेगवेगळ्या राज्यात बाकी आमदारांसोबत फिरत होतो. काल सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर आज मी गावात आलो आहे. आम्ही शिवसेना सोडली नाहीये, आम्ही शिवसेनेतच आहोत. शिवसेना वाचवायला आम्ही बाहेर पडलो आहोत.

आम्ही कोणत्याही पक्षात प्रवेश करत नाहीये. लवकरच आम्हाला मान्यता मिळेल, बहुमत आमच्याकडे असल्याने धनुष्यबाण आमच्याचकडे आहे असे खुलासा गुलाबराव पाटलांनी केला आहे.

उद्धव ठाकरे देव पण…, शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ आमचाच; बंडखोर आमदाराने संजय राऊतांना सुनावलं

पुढे बोलताना गुलाबराव पाटलांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. आज आमच्याकडे 40 आमदार आहेत, त्याचबरोबर 18 पैकी 12 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत, 22 माजी आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट पाटलांनी केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पार्टी आम्हीच अशाच पद्धतीने पुढे वाढवणार आहोत.

आम्ही शिंदे साहेबांना अगोदरच सांगितले होते की दुसऱ्या कोणत्याच पक्षात जाणार नाही आपण शिवसेनेतच राहणार आहोत. आम्ही सत्ता सोडून बाहेर पडलो आहोत असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

    follow whatsapp