शेजाऱ्याच्या भरवशावर १२ वर्षाच्या मुलीला घरी एकटं सोडून आईवडील कामावर गेले. घरात अभ्यास करत बसलेल्या मुलीला बघून शेजाऱ्याची नियत फिरली अन् नको तेच झालं. शेजाऱ्याने मुलीवर अत्याचार केला आणि घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारू अशी धमकीही दिली. मुलीचे आईवडील कामावरून घरी परतल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला.
ADVERTISEMENT
ऑनलाईन क्लास करत बसलेल्या एका १२ वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्यानेच बलात्कार केल्याची घटना घडली आहे दिल्लीत. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो कायद्यातील कलमान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सातारा : गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल
सहावीच्या वर्गात शिकत असलेल्या १२ वर्षीय मुलगी आईवडिलांसोबत दिल्लीतील नरेला औद्योगिक परिसरात राहते. पीडितेचे आईवडील एका कारखान्यात कामाला आहेत. बुधवारी मुलगी ऑनलाईन क्लासमुळे एकटीच घरी थांबली होती.
मुलीला घरी ठेवून आईवडील कामावर गेले. जाताना त्यांनी शेजारी राहणाऱ्या आरोपी सौरभला याबद्दलची माहिती दिली. मुलगी घरी एकटीच असल्याचं पीडितेच्या आईवडिलांनी त्याला सांगितलं. मुलगी घरात एकटीच असल्याचं समजल्यानंतर आरोपी सौरभ तिच्या घरी गेला.
मुंबईत गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, युवकाला विवस्त्र करून ब्लॅकमेल करणाऱ्या तिघांना अटक
पीडित मुलगी ऑनलाईन अभ्यास करत बसली होती. मुलगी एकटीच असल्याचं पाहून आरोपी घरात घुसला आणि त्याने अत्याचार केले. बलात्कार केल्यानंतर आरोपीने मुलीला झालेल्या प्रकाराबद्दल कुणालाही सांगू नको, अन्यथा जीवे मारेन, अशी धमकीही दिली.
डोंबिवली : टिळकनगरमधील महिलेच्या हत्येचं गुढ उलगडलं; २४ तासांत समोर आलं कारण
बेशुद्धावस्थेत पडली होती मुलगी…
दरम्यान, सायंकाळी आईवडील कामावरून घरी परतले. घरात आल्यानंतर त्यांना मुलगी बेशुद्धावस्थेत पडल्याचं दिसलं. त्यानंतर त्यांनी तत्काळ याची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली. पीडितेनं तिच्यासोबत झालेली आपबीती पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी करून गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सौरभला बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT