बीड : रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

मुंबई तक

13 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:06 AM)

बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 10 मे रोजी अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे ही घटना घडली आहे. गावातील एका रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने हे पाऊल उचलल्याचं कळतंय. अल्पवयीन मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनंतर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती […]

Mumbaitak
follow google news

बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 10 मे रोजी अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे ही घटना घडली आहे. गावातील एका रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने हे पाऊल उचलल्याचं कळतंय.

हे वाचलं का?

अल्पवयीन मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनंतर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती तर तिचे वडील राज्य परिवहन महामंडळात पालघर येथे कार्यरत होते. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या घराशेजारी राहणारा अकबर बबन शेख हा तरुण वारंवार मुलीला त्रास देत होता.

नालासोपारा : सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण

कम्प्युटर क्लासला जाताना वारंवार मुलीची छेड काढणं, रस्त्यात अडवून वेडवाकडं बोलणं, सतत पाठलाग करणं असे प्रकार आरोपी अकबर शेख करत होता. पीडित मुलीने याबाबतीत आपल्या आईला कल्पना दिली होती. 6 मे च्या दिवशी मुलीच्या वडिलांनी अकबरला घरी बोलवून समज देत असा प्रकार न करण्यासाठी बजावलं होतं. परंतू यानंतरही अकबरच्या वागण्यात फरक पडला नाही, त्याने यानंतरही पीडित मुलीला त्रास देणं सुरु ठेवलं.

पीडित मुलीने आईला याबाबत पुन्हा तक्रार केली असता आईने बाबा आणि दादा आले की यावर तोडगा काढू असं सांगत तिची समजूत काढली. मंगळवारी रात्री साडेआठ वाजल्याच्या दरम्यान आई गावात जागरणाच्या कार्यक्रमाला गेली असता पीडित मुलगी घरात एकटीत होती. रात्री 11 वाजता घरात कोणीच नसल्यामुळे मुलीने साडीने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. आई घरी आल्यानंतर तिला हा सर्व प्रकार कळला. यानंतर नातेवाईकांच्या मदतीने मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं.

दरम्यान गुन्हा दाखल झाल्याचं कळताच आरोपी अकबर खान फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ व्यक्त केली जात आहे.

    follow whatsapp