पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आणखी दोन रूग्ण आढळले आहेत. पुणे जिल्ह्यातील नीरा गावातले हे रहिवासी आहे. थोपटेवाडी या ठिकाणी ते वास्तव्य करतात. पुरंदर तालुक्याच्या आरोग्य अधिकारी उज्वला जाधव यांनी इंडिया टुडेशी बोलताना ही माहिती दिली आहे. हे दोन रूग्ण म्हणजे एक 14 वर्षांचा मुलगा आणि 48 वर्षांची एक स्त्री आहे. 15 जुलैला या दोघांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ज्यानंतर हे दोघेही कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने बाधित झाले आहेत असं समजतं आहे. या दोघांवरही उपचार करण्यात आले असून दोघांनाही उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोघांचीही प्रकृती आता व्यवस्थित आहे असंही उज्वला जाधव यांनी सांगितलं. या दोघांच्या संपर्कात आलेल्यांच्या 100 जणांची चाचणीही करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
यााधी 28 जुलैला मुंबईतही डेल्टा प्लस व्हेरिएंटचे दोन रूग्ण आढळले होते त्यामुळे डेल्टा व्हेरिएंट आढळलेल्या एकूण रूग्णांची संख्या 23 झाली होती. त्यापाठोपाठ आता आणखी 2 रूग्ण आढळले आहेत त्यामुळे ही संख्या 25 झाली आहे. डेल्टा व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न असं जाहीर करण्यात आलं आहे.
Variant Of Concern म्हणजे नेमकं काय?
जेव्हा कोणताही व्हायरस हा जास्त प्रमाणात रोग प्रसार वाढवणारा असतो किंवा जास्त प्रमाणात साथ रोगामुळे मृत्यू वाढवणारा असतो तेव्हा त्याला Variant Of Concern असं जाहीर केलं जातं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात आणि महाराष्ट्रात हाहाकार माजवला. कोरोनाची दुसरी लाट देशातून आणि राज्यातून ओसरत असतानाच आता समोर धोका आहे तो डेल्टा प्लसचा. त्याला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न असं जाहीर करण्यात आलं आहे. म्हणजेच काळजी वाढवणारा व्हेरिएंट किंवा व्हायरसचा प्रकार असं त्याला जाहीर करण्यात आलं आहे. कोरोनाचा विषाणू रूप बदलू लागला आहे. जगभरात कोरोनाच्या व्हायरसचे वेगवेगळे व्हेरिएंट आहेत. त्या व्हेरिएंटना WHO ने नावंही दिली आहेत. अशावेळी आता डेल्टा प्लस हा व्हेरिएंट काळजी वाढवणारा व्हेरिएंट म्हणून जाहीर झाला आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंट नेमका काय आहे?
कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये आणखी बदल होऊन म्हणजेच म्युटेशन होऊन डेल्टा प्लस हा व्हेरिएंट तयार झाला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये डेल्टा व्हेरिएंटमधे असलेले सगळे म्युटेशन आहेत. तसंच या व्हेरिएंटमध्ये K417N हे म्युटेशनही आढळलं आहे. भारतात सगळ्यात आधी आढळलेल्या डेल्टा व्हेरिएंटचं शास्त्रीय नाव B.1.617.2 असं आहे. तर आता म्युटेट झालेल्या म्हणजेच बदल झालेल्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचं नाव हे B.1.617.2.1 असं आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिलेली माहिती अशी ‘कोरोना संसर्गाची दसरी लाट अधिक झपाट्याने पसरण्यासाठी डेल्टा व्हेरिएंट कारणीभूत होता. यात आणखी एक म्युटेशन झालं आहे. याला डेल्टा प्लस असं नाव देण्यात आलं आहे.’
ADVERTISEMENT