महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बुलढाणा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोटारसायकलवरुन आपल्या घरी जाणाऱ्या जोडप्याला वाटेत थांबवून दोन अज्ञात आरोपींनी पतीला मारहाण केली. यानंतर आळीपाळीने पत्नीवर बलात्कार केला आहे. इंदिरा नगर भागात ही घटना घडली असून बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित दाम्पत्य ६ फेब्रुवारीला रात्री आपल्या मोटारसायकलवरुन इंदिरा नगर भागातून घरी जात होतं. यावेळी दोन अज्ञात आरोपींनी या दाम्पत्याची मोटारसायकल थांबवत, पतीला थेट मारहाण करायला सुरुवात केली. पतीचा बचाव करायला गेलेल्या महिलेवर या आरोपींनी नंतर आळीपाळीने बलात्कारही केला.
चोरीसाठी विजेच्या तारा कापायला टॉवरवर चढला, गळफास लागून चोराने गमावला जीव
पतीला जिवे मारण्याची धमकी देत आरोपींनी हे कृत्य केल्याचं कळतंय. ७ फेब्रुवारीला या पीडित दाम्पत्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.
ट्रेनच्या एसी डब्यातून गांजाची तस्करी, मुद्देमालासह आरोपी अटकेत
ADVERTISEMENT