स्वाईन फ्लू या आजाराने नागपूरमध्ये पुन्हा हातपाय पसरले आहेत. नागपूर शहरात दोन महिलांचा गुरूवारी स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. एका महिलेचं वय ६६ वर्षे तर दुसऱ्या महिलेचं वय ७२ वर्षे इतकं होतं असं कळतं आहे. नागपूर शहरात या दोन मृत्यूंमुळे एकूण स्वाईन फ्लू मुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ६२ झाली आहे.
ADVERTISEMENT
नागपूर शहरात स्वाईन फ्लूमुळे ६२ मृत्यू
नागपूर शहरात स्वाईन फ्लूमुळे आत्तापर्यंत एकूण ६२ मृत्यू झाले आहेत. ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यापैकी नागपूर महापालिका क्षेत्रातील २१ लोक आहेत. तर ग्रामीण भागातले ९ लोक आहेत. इतर जिल्ह्यातील आणि राज्यातील एकूण १४ व्यक्ती अशा ६२ जणांचा मृतांमध्ये समावेश आहे.
नागपूरमध्ये स्वाईन फ्लूचे ६५४ रूग्ण
नागपूरमध्ये स्वाईन फ्लूच्या रूग्णांची संख्या ६५४ झाली आहेत. त्यापैकी ५७६ रूग्ण बरे झाले आहेत. स्वाई फ्लू संक्रमित नागपूर शहरात ३५४, नागपूर ग्रामीण भागातले ११४ रूग्ण तर इतर जिल्ह्यातील १८६ रुग्णांचा समावेश आहे.
स्वाईन फ्लूची लक्षणं काय आहेत?
सर्दी होणं, नाक गळणं, अंगदुखी, घसा दुखणं या सगळ्या गोष्टी म्हणजे स्वाईन फ्लूची लक्षणं आहेत. यापैकी कोणतीही लक्षणं असतील तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घ्या. वेळेवर योग्य उपचार घेतले तर स्वाईन फ्लू बरा होऊ शकतो. कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचं आवाहन नागपूर महापालिकेनं केलं आहे.
स्वाईन फ्लू म्हणजे काय आणि कसा पसरतो?
स्वाईन फ्लूश्वसननलिकेत होणारा संसर्ग आहे. इन्फ्लूएन्झा ‘टाईप-A’ च्या ‘H1N1’ विषाणूमुळे हा आजार होतो. तज्ज्ञ सांगतात, ‘H1N1′ विषाणू नाक, घसा आणि फुफ्फुसातील पेशींना संक्रमित करतो. स्वाईन फ्लू’ ची लागण झालेल्या व्यक्तीचा खोकला, शिंक किंवा या व्यक्तीने स्पर्श केलेल्या गोष्टीच्या संपर्कात आल्याने डोळे, नाक किंवा तोंडावाटे ‘स्वाईन फ्लू’ पसरतो. स्वाईन फ्लूची सर्वप्रथम लागण डुकरांना झाल्याचं आढळून आलं. त्यानंतर हा आजार प्राण्यांपासून माणसापर्यंत पोहोचला.
ADVERTISEMENT