सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात उमदी येथे मंगळवेढा रोडावर दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत, दोन तरुणांची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या हाणामारीत आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. या तरुणाला उपचारासाठी सोलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर चॅटींगवरुन झालेल्या वादाचा राग मनात धरुन या तरुणांची हत्या करण्यात आली आहे. गुंडा उर्फ मदगोंडा बगली आणि संतोष माळी अशी या दोन मृत तरुणांची नावं आहेत. टोळी युद्धातील वर्चस्ववादातून या हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज उमदी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या हाणामारीत प्रकाश परगोंड हा तरुण जखमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगलीत दोन टोळ्यांमध्ये वर्चस्ववादाचा संघर्ष सुरु होता. याच संघर्षात ठिणगी पडून झालेल्या हाणामारीत दोघांची हत्या झाली आहे. जत तालुका या हत्याकांडाने हादरुन गेला असून पोलिसांनी सात संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
दरोड्याच्या घटनांनी सोलापूर हादरलं, दरोडेखोरांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; महिला जखमी
ADVERTISEMENT