आता गुजरातमधल्या शहरांमध्येही नाईट कर्फ्यू!

मुंबई तक

• 09:39 AM • 07 Apr 2021

गांधीनगर: कोरोना विषाणूचे वाढती रुग्णसंख्या पाहता गुजरात सरकारने राज्यातील 20 शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा आदेश जारी केला असल्याचं समजतं आहे. यापूर्वी गुजरात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला वीकेंड कर्फ्यू लागू करण्यास सांगितले होते. राज्य सरकारने राज्यात 3 ते 4 दिवस कठोर कर्फ्यू लावावा असे देखील उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले होतं. यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी […]

Mumbaitak
follow google news

गांधीनगर: कोरोना विषाणूचे वाढती रुग्णसंख्या पाहता गुजरात सरकारने राज्यातील 20 शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा आदेश जारी केला असल्याचं समजतं आहे. यापूर्वी गुजरात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला वीकेंड कर्फ्यू लागू करण्यास सांगितले होते. राज्य सरकारने राज्यात 3 ते 4 दिवस कठोर कर्फ्यू लावावा असे देखील उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले होतं.

हे वाचलं का?

यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गुजरातमधील फक्त 20 शहरात नाईट कर्फ्यू लावण्याची घोषणा केली आहे. मात्र, यावेळी त्यांनी कोरोनासंदर्भात अनेक नवीन निर्बंध देखील जाहीर केले आहेत.

कोरोना रोखण्यासाठी गुजरात सरकारने लग्न सोहळ्यातील उपस्थितींच्या संख्येवर मर्यादा आणली आहे. याशिवाय राज्यातील 20 शहरांमध्ये रात्री ८ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील सर्व प्रमुख कार्यक्रम हे 30 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर शासकीय कार्यालये देखील 30 एप्रिलपर्यंत प्रत्येक शनिवारी बंद राहतील.

‘अवघ्या 10 दिवसात कोरोनाची दुसरी लाट आपल्याला रोखता येईल’

गुजरातमध्ये कोरोनाचे रुग्ण हे झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. गुजरातमध्ये दररोज कोरोनाचे 3 हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी गुजरातमध्ये एकूण 3 हजार 280 नवे रुग्ण सापडले होते.

गुजरातमधील ही आजवरची एका दिवसातील आतापर्यंतची सर्वात जास्त कोरोना रुग्ण संख्या आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत 3 लाख 24 हजार 878 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर मृतांची संख्याही ही 4 हजार 598 वर पोहोचली आहे.

देशात कुठेही कोरोनाच्या लसीचा तुटवडा नाही – आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचं स्पष्टीकरण

ही आकडेवारी लक्षात घेऊन गुजरातच्या उच्च न्यायालयाने मंगळवारी चिंता व्यक्त केली आणि राज्यातील सरकारी, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी घालण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत. या व्यतिरिक्त उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शनिवार व रविवार कर्फ्यू लागू करण्यास सांगितले आहे.

पाहा गुजरातच्या लॉकडाऊनबाबत संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे:

दरम्यान, गुजरातच्या लॉकडाऊनबाबत संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘आपण पाहिलं असेल की, गुजरात हे महाराष्ट्राचं शेजारील राज्य आहे. तेथील हायकोर्टाने त्यांच्या सरकारला विचारणा केली आहे की, लॉकडाऊन का केलं गेलं नाही? रुग्णांची संख्या पाहून लॉकडाऊन केलं जाणं गरजेचं आहे.’

‘हे हायकोर्टाचे आदेश आहेत. त्यामुळे याचा अर्थ असा आहे की, जर गुजरात सरकारने लॉकडाऊन केलं नाही तर परिस्थिती गंभीर होईल. हे हायकोर्टाचं निरिक्षण आहे.’ असं म्हणत संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊनचं समर्थन केलं आहे.

कोणतंही सरकार आनंदाने लॉकडाउन करत नाही, विरोधकांनी राजकारण करु नये – संजय राउत

मात्र, आता गुजरातमध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता तेथील सरकार सुद्धा लॉकडाऊन करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp