मुंबईत काही दिवसांपूर्वीच शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. याच दरम्यान शहरात आणखी एक हादरवून सोडणारी घटना घडली आहे. मुंबईच्या कुर्ला भागातील एका इमारतीच्या टेरेसवर लिफ्ट रुममध्ये २० वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला आहे. या तरुणीवर बलात्कार करुन नंतर तिची हत्या करण्यात आल्याचं समजतंय.
ADVERTISEMENT
कुर्ला भागातील HDIL कंपाऊंड भागातील एका इमारतीच्या टेरेसवर हा प्रकार घडला आहे. विनोबा भावे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. अद्याप पीडित मुलीची ओळख पटलेली नसून पोलीस आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. ज्यांनी पहिल्यांदा या मुलीचा मृतदेह पाहिला त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत.
बारामती: पोलिसांना पाहून पळून जाणं जीवावर बेतलं, ‘त्याला’ मृत्यूने गाठलं
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री काही मुलं या इमारतीच्या टेरेसवर इन्स्टाग्राम व्हिडीओ तयार करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. ज्यानंतर या मुलांनी आजुबाजूच्या लोकांना बोलावून पोलिसांना याची माहिती दिली. या मुलीच्या डोक्यावर गंभीर जखम झाली असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
ADVERTISEMENT