वर्धा : २१ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

मुंबई तक

• 05:38 AM • 04 Mar 2021

गेल्या काही दिवसांपासून विदर्भात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. अमरावती, अकोला यासारख्या शहरात स्थानिक प्रशासनाने ८ मार्चपर्यंत लॉकडाउन जाहीर केला असून अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू झाली आहे. अशातच वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील २१ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. अवश्य वाचा – अमरावती विद्यापीठातील ५६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण बुधवारी विद्यापीठात […]

Mumbaitak
follow google news

गेल्या काही दिवसांपासून विदर्भात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. अमरावती, अकोला यासारख्या शहरात स्थानिक प्रशासनाने ८ मार्चपर्यंत लॉकडाउन जाहीर केला असून अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू झाली आहे. अशातच वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील २१ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.

हे वाचलं का?

अवश्य वाचा – अमरावती विद्यापीठातील ५६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

बुधवारी विद्यापीठात ३ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ अँटीजेन कोरोना चाचणीचं शिबीर आयोजित केलं. या शिबीरात ११२ विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. ज्यामध्ये १८ विद्यार्थ्यांना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे विद्यापीठात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या २१ वर गेली आहे. कोरोनाची लागण झालेले सर्व विद्यार्थी हे एम.ए. आणि पी.एच.डी. चा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत.

अवश्य वाचा – धक्कादायक! RTPCR नमुन्यांमध्ये बुरशी, आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा

खबरदारीचा उपाय म्हणून पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या विद्यार्थ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. यानंतर विद्यापीठातील सर्व स्टाफ, प्रोफेसर आणि इतर कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी करुन घेण्याचा निर्णय स्थानिक आरोग्य विभागाने घेतला आहे. गेल्या १५ दिवसांत वर्ध्यात १९२० जणांना कोरोनाची लागण झाली असून २३ जणांनी यात आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या हा स्थानिक प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनली आहे

    follow whatsapp