विजयकुमार बाबर, सोलापूर: ‘तुझ्या माहेरच्या लोकांकडून मानपान होत नाही’, असे म्हणत वारंवार मानसिक व शारीरिक छळ केल्यामुळे आपल्या मुलीने दोन लेकींना घेऊन आत्महत्या केली. अशी फिर्याद एका महिलेने तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी आता 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून,पतीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
पती आकाश ऊर्फ अक्षय उत्तम ढेकळे (वय 22), सासरे उत्तम मच्छिंद्र ढेकळे (वय 54) आणि दीर अण्णासाहेब उत्तम ढेकळे (वय 25, रा.. पाथरी, ता. उत्तर सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर अनिता उत्तम ढेकळे, पूजा अण्णासाहेब ढेकळे (रा. पाथरी), विलास सुरवसे, सोजरबाई विलास सुरवसे (दोघे रा. नंदगाव, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), साळूबाई बाळा गुंड, बाळा गुंड, छकुली (पूर्ण नाव नाही सर्व रा. पाथरी) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सारिका (वय 22) हिचा विवाह चार वर्षांपूर्वी अक्षयसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर सासरच्या लोकांनी मानपान केला नाही, सोने दिले नाही. याचा राग मनात धरून मयत सारिका यांना सतत अपमानीत करणे, नवीन कपडे न घेणे, उपाशी ठेवणे, माहेरी न पाठवणे आणि फोनवर बोलू न देणे यासारखा छळ सुरु होता. तसेच दोन्ही मुलीच झाल्याने टोचून बोलणे आणि मारहाण करण्याचा प्रकार सुरू केला होता.
बीड : भाजप आमदाराच्या पतीला जिवे मारण्याची धमकी, शिपायाच्या गळ्याला चाकू लावून लुटलं
दोन दिवसांची पोलीस कोठडी
गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्यात आलेल्या पती आकाश ऊर्फ अक्षय उत्तम ढेकळे, सासरा उत्तम मच्छिद्र ढेकळे आणि दीर अण्णासाहेब उत्तम ढेकळे या तिघांना शनिवारी न्यायदंडाधिकारी आर.ए.मिसाळ यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीशांनी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आरोपीतर्फे अॅड. प्रशांत नावगिरे, अॅड. श्रीपाद देशक तर सरकारतर्फे बनसोडे काम पहात आहेत.
ADVERTISEMENT