Palghar : पालघर जिल्ह्यात एका 29 वर्षीय पुरूषाने त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या ऑफिसमध्ये घुसून हल्ला केला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 109 (खूनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि गुरुवारी आरोपी अक्षय पाटीलला अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>New India Cooperative Bank : बड्या उद्योगपतीच्या मुलाला अटक, आरोपीला पळून जायला मदत केली? प्रकरण काय?
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपीचं 23 वर्षीय मुलीशी लग्न ठरलं होतं, पण नंतर काही कारणांमुळे ते पुढे ढकलण्यात आलं.तसंच मुला-मुलीला एकमेकांना भेटण्यासाठीही मनाई करण्यात आली होती. त्याचाच राग आल्यानंआरोपीने पाटील बुधवारी मुलीच्या ऑफिसमध्ये जाऊन तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून तिला जखमी केलं. त्यानंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हे ही वाचा >>Devendra Fadnavis यांना धमकी नेमकी कुणी दिली? मुंबई पोलिसांकडे आलेल्या मेसेजमध्ये काय म्हटलंय?
लग्न आणि प्रेम प्रकरणांमध्ये अशी अनेक प्रकरणं यापूर्वी समोर आली आहेत. दोन महिन्यांपूर्वी नागपूर शहरात प्रेमप्रकरणातून एक धक्कादायक घटना घडली होती. ब्रेकअपनंतर संतप्त झालेल्या एका प्रेयसीनं तिच्या प्रियकरावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत तिचा सावत्र भाऊ आणि मित्रानेही तिला साथ दिली होती. पीडित मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्यायिक संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. आरोपी मुलगी तिच्या प्रियकराच्या असभ्य वागण्यामुळे संतापली होती. त्यामुळे तिने हे केल्याचं समोर आलं होतंय.
ADVERTISEMENT
