Mahayuti on Pehalgam : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देश हादरला. त्यानंतर आता अडकलेल्या पर्यटकांना सोडवण्यासाठी प्रत्येक राज्य प्रयत्न करतंय. मात्र, महाराष्ट्र सरकारमध्ये राजकीय श्रेयासाठी लढाई सुरू झाली आहे. महायुती आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाने अडकलेल्या पर्यटकांसाठी आणि पीडितांच्या कुटुंबियांसाठी मदत आणि बचाव कार्यासाठी स्वतंत्रपणे काम करण्यास सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. शिंदेंनी नगरविकास विभागाच्या बैठका रद्द केल्या. त्यांनी ठाण्यातच राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे संध्याकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमाला गेले.
एकनाथ शिंदे थेट काश्मीरला
अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी बचाव कार्याचे नेतृत्व करण्यासाठी एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये गेले. एका खाजगी चार्टर्ड विमानाने शिंदे काश्मीरला रवाना झाले. त्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये असं म्हटलं आहे की, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, एकनाथ शिंदे हे सर्वात आधी मदतीसाठी पोहोचतात.
हे ही वाचा >> Maharashtra Weather : ठाणे, रायगड, रत्नागिरीत उष्ण व दमट हवामान! कोणत्या जिल्ह्यात पाऊस?
मंगळवारी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी या विषयावर चर्चा केली. काश्मीरमधून पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी एक विशेष विमानाची व्यवस्था केली जाईल, अशी घोषणाच शिंदेंनी यावेळी केली. त्यानंतरच ही श्रेयवादाची लढाई असल्याची चर्चा सुरू झाली.
भाजप खासदाराची घोषणा
बुधवारी सकाळी, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घोषणा केली. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर, महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदत आणि बचाव कार्यासाठी एक विशेष विमान काश्मीरला पाठवलं जाईल" अशी माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांकडे सोपवली जबाबदारी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप मंत्र्यांना राज्य आणि केंद्र सरकारशी समन्वय साधून मृतांना त्यांच्या नातेवाईकांकडे परत आणण्यासाठी वेगवेगळी कामं सोपवली.
भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांना विशेष विमानाने काश्मीरला जाण्यासाठी तैनात करण्यात आलं होतं. तर मंत्री आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांना पनवेल आणि डोंबिवलीहून मृतदेह घेऊन जाणारे विमान मुंबईला पोहोचेल तेव्हा मुंबई विमानतळावर उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे.
हे ही वाचा >> 'आमच्या समोर 5 जणांना गोळ्या घातल्या, आम्ही घाबरून अजान म्हटली...', पुण्याच्या आसावरी जगदाळेंनी सांगितला थरकाप उडवणार थरार
दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी केलं आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत दरकेकर यांच्या नेतृत्वाखालील एक पथक मंगळवारी रात्रीच श्रीनगरला पोहोचलं आणि महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी मदतकार्य सुरू केलं.
शिंदे यांनी त्यांच्या पक्षाचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, गृह राज्यमंत्री (शहरी) योगेश कदम यांना मुंबई विमानतळावर आणि मंत्री प्रकाश आबिटकर यांना पुणे विमानतळावर उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.
याशिवाय, शिंदे यांनी त्यांचे जवळचे सहकारी आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिलीप देसले यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पनवेलला जाण्यास सांगितले.
अजित पवारही अॅक्शनमध्ये
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक प्रेस रिलीज जारी करून म्हटलं, की मी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी बोललो आहे. महाराष्ट्राच्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त विमान उड्डाणं उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
तसंच, राज्य सरकारने जाहीर केलं की, महाराष्ट्रातील बाधित नागरिकांना मदत करण्यासाठी राज्य आपत्कालीन ऑपरेशन्स सेंटर (मंत्रालय नियंत्रण कक्ष) मध्ये दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे ही वाचा >> पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी बॅगमध्ये काय आणलेलं? समोर आली मोठी माहिती
राज्य आपत्कालीन ऑपरेशन्स सेंटरचे व्यवस्थापक म्हणून विश्वेश्वर सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षात नियंत्रण कक्ष अधिकारी म्हणून नितीन मसाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही घटना लक्षात घेऊन, आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचे संचालक सरीशकुमार खडके यांनी मदत मागणाऱ्या नागरिकांसाठी किंवा त्यांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
फडणवीस यांनी भरपाई जाहीर केली
पहलगाम हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या 6 कुटुंबांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल. याशिवाय, राज्य सरकारच्या खर्चाने महाराष्ट्रातील पर्यटकांना काश्मीरममधून परत आणण्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली.
विरोधकांनी लक्ष्य केलं
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी समन्वयाच्या अभावाबद्दल सरकारवर टीका केली. वडेट्टीवार म्हणाले की, मंत्र्यांची तात्काळ बैठक बोलावून सरकारने आपली कृती कशी करावी हे स्पष्ट करायला हवे होतं. त्याऐवजी, सत्ताधारी महायुतीतले सहयोगी पक्ष संकटाच्या काळात श्रेय मिळवण्यासाठी एकमेकांशी भिडत आहेत. वडेट्टीवार म्हणाले की, हे दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे.
त्याच वेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, कोणत्याही प्रकारची मदत स्वागतार्ह आहे, पण परिस्थितीचा राजकीय फायदा घेण्यासाठी ते असू नये.
ADVERTISEMENT
