महाराष्ट्र हादरला ! ५५ वर्षीय नराधमाचा तीन अल्पवयीन मुलींवर शारिरिक अत्याचार

मुंबई तक

• 10:38 AM • 20 Feb 2022

वर्धा जिल्ह्यात गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या सिल्ली गावात एका नराधमाने तीन अल्पवयीन मुलींवर अंधाराचा फायदा घेत शारिरिक अत्याचार केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी केशव वानखेडे याला अटक केली असून न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी केशव वानखेडे हा लोखंडी पिंप विक्रीचं काम करतो. विविध गावांत […]

Mumbaitak
follow google news

वर्धा जिल्ह्यात गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या सिल्ली गावात एका नराधमाने तीन अल्पवयीन मुलींवर अंधाराचा फायदा घेत शारिरिक अत्याचार केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी केशव वानखेडे याला अटक केली असून न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी केशव वानखेडे हा लोखंडी पिंप विक्रीचं काम करतो. विविध गावांत जाऊन तो लोखंडी पिंप विकायचा. यावेळी तो गिरड पोलीस ठाण्याच्याअंतर्गत येणाऱ्या एका गावात विक्रीसाठी आला होता. यादरम्यान गावातील रस्त्याच्या कडेला थांबून तो पिंप विकत असताना त्याची नजर दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर पडली. नराधम काळोखाचा फायदा घेत अल्पवयीन मुलींना जवळच रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ओसाड जागेवरील बाथरुममध्ये घेऊन गेला.

डोंबिवली : पुस्तक देण्याच्या बहाण्याने आलेल्या शेजारच्या तरुणाने…; त्या महिलेच्या हत्येचं गूढ उलगडलं

या ठिकाणी आरोपीने दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केला. आरोपी इतक्यातच थांबला नाही तर त्याने आणखी एका मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं. घडलेल्या प्रकाराबद्दल मुलींनी आपल्या पालकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी या प्रकरणात पोलीस तक्रार दाखल केली. ज्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

अरेरे! अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाला आईने परकरच्या नाडीने गळा आवळून संपवलं

आरोपी केशव वानखेडे हा चंद्रपूर जिल्ह्यातला रहिवासी असून पोलिसांनी त्याच्यावर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

‘माझ्यावर बलात्कार केला, न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकीही द्यायाचा’, 10 वीच्या विद्यार्थिंनीची आत्महत्या

    follow whatsapp