कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातली अनेक कुटुंब करत आहेत. आतापर्यंत या लाटेमुळे अनेकांची आयुष्य उध्वस्त झाली आहेत. जामखेडच्या जाधव कुटुंबाला कोरोनाच्या या लाटेचा दुहेरी फटका बसला आहे.
ADVERTISEMENT
जामखेडच्या जाधव कुटुंबातील सर्व व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. यापैकी ३ व्यक्तींचे एका आठवड्यात मृत्यू झाले. उर्वरित सदस्यांवर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु असताना चोरट्यांनी जाधव यांच्या घरावर डल्ला मारत त्यांची आयुष्यभराची जमापुंजी लुटून नेली आहे. सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर वस्तू चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन लुटून नेल्या आहेत. कोरोनामुळे घरातल्या तिघा व्यक्तींचा मृत्यू आणि त्यानंतर चोरट्यांनी मारलेला डल्ला यामुळे जाधव कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे.
लक्ष्मण जाधव, लक्ष्मी जाधव आणि मुलगा श्रीकांत जाधव यांचा एका आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू झाला. सर्वात आधी लक्ष्मण जाधव यांची प्राणज्योत मालवली त्यानंतर दोन दिवसांनी मुलगा श्रीकांतचीही झुंज अयशस्वी ठरली. या धक्क्यातून लक्ष्मण यांच्या पत्नी लक्ष्मी सावरल्या नाहीत आणि त्यांचाही मृत्यू झाला. याव्यतिरीक्त श्रीकांत जाधवची पत्नी रेखा हिच्यावर शेवगाव तर जाधव यांचा धाकटा मुलगा प्रशांत आणि त्याच्या पत्नीवर संगमनेरमध्ये उपचार सुरु आहेत. संपूर्ण कुटुंब कोविड सेंटरमध्ये असतानाच चोरट्यांनी हा डल्ला मारला आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT