चिंचवड : BJP आमदाराच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला, कोणतीही जिवीतहानी नाही

मुंबई तक

• 02:28 PM • 23 Nov 2021

चिंचवड विधानसभेचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे धाकटे भाऊ शंकर जगताप यांच्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब चा हल्ला करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी पिंपळे-सौदागर भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे धाकटे बंधू शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. पिंपळे सौदागर येथे त्यांचे कार्यालय आहे. मंगळवारी दुपारी […]

Mumbaitak
follow google news

चिंचवड विधानसभेचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे धाकटे भाऊ शंकर जगताप यांच्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब चा हल्ला करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी पिंपळे-सौदागर भागात ही घटना घडली आहे.

हे वाचलं का?

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे धाकटे बंधू शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. पिंपळे सौदागर येथे त्यांचे कार्यालय आहे. मंगळवारी दुपारी एका दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी सोबत घेऊन आलेले दोन पेट्रोल बॉम्ब कार्यालयाच्या दिशेने फेकले. फेकण्यात आलेला पेट्रोल बॉम्ब हा जगताप यांच्या कार्यालयाच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक डीपीजवळ पडला.

सुदैवाने हा बॉम्ब कार्यालया मधे पडला नसल्याने घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत.

    follow whatsapp