नागपूर: देशभरात वाढलेल्या कोरोना (Corona) संसर्गामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. यातच राज्यात याचा काळा बाजार देखील सुरु झाला आहे. अशा वातावरणात नागपुरात (Nagpur) ऑक्सिजन चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. भिलाईच्या खासगी कंपनीकडून चार टँकर ऑक्सिजन नागपुरात येणार होते पण हे टँकरमधील ऑक्सिजन परस्पर दुसर्या राज्यात विकण्याचा प्रयत्न होता. पण याबाबतची माहिती योग्य वेळेत मिळाली आणि चारही टँकर चालकांना पकडण्यात आले.
ADVERTISEMENT
देवरी सीमेवर दोन आणि जालना-औरंगाबाद महामार्गावर दोन टँकर पकडले गेले. नागपूर आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता नसावी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मैदानात उतरावे लागले. जिल्हा प्रशासनासह ऑक्सिजन पुरवठ्याचे समन्वयची जबाबदारी गडकरी यांनी सामाजिक कार्यकर्ते प्यारे खान यांना सोपविली आहे.
नागपूरहून भिलाई येथे चार टँकर ऑक्सिजन भरण्यासाठी रवाना केले. संध्याकाळपर्यंत हे टँकर नागपूरला पोहोचणार होते. प्यारे खान यांनी तपास केला आणि कंपनीच्या बाजूने हे समजले की हे चारही टँकर खाली पडले आहेत. कंपनीचा फोनही बंद होता. कोणताही समन्वय न झाल्याने खान यांनी आपली टीम भिलाई येथे पाठविली आणि तेथे तपासणी केल्यावर त्यांना कळले. की चारही टँकर ऑक्सिजनने भरलेले आहेत आणि प्लांटवरून कधीच निघाले सुद्धा आहेत. त्यानंतर ही माहिती प्यारे खान यांनी तात्काळ जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिली.
ऑक्सिजनवरुन राजकारण : कर्नाटकने महाराष्ट्राचा ५० टन ऑक्सिजन साठा रोखला – सतेज पाटील
दरम्यान, ही माहिती मिळताच आरटीओ अधिकाऱ्यांनी देवरी हद्दीत नाकाबंदी करण्यास सुरवात केली. यानंतर सबंधित 2 टँकर चालकांना रात्री उशिरा पकडण्यात आलं. दोन टँकर चालकांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर दोन टँकर चालक हे जालना-औरंगाबाद महामार्गावर असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी दोन्ही टँकर चालकांचे मोबाईल ट्रॅक करण्यात सुरुवात केली. दुसरीकडे जालना पोलिसांनी महामार्गावर नाकाबंदी सुरू केली. अखेर उर्वरित दोन टँकर चालक हे सकाळी पोलिसांच्या हाती सापडले. त्यानंतर हे चारही टँकर नागपुरात पोलिसांनी आणले. दरम्यान, ज्यांच्या निर्देशानुसार टँकर चालक काम करीत होते त्या व्यक्तीचा तपास सुरू आहे. यासाठी पोलिसांनी इतर जिल्ह्यातील पोलिसांशी समन्वय साधण्यास सुरवात केली.
मोदी सरकारने SOP ठरवण्यासाठी सात दिवस लावल्याने विदेशातली मदत लांबली, ऑक्सिजन तुटवडा वाढला
या घटनेबाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले की, नागपूरसाठी चार ऑक्सिजन टँकरची खेप भिलाई येथून चालविली जात होती, परंतु ही खेप इतरत्र वळविण्यात आली. पोलिसांना वेळीच माहिती देण्यात आली त्यामुळे आम्ही इतर जिल्ह्यातील पोलिसांशी संपर्क साधला आणि नाकाबंदी केली आणि चारही टँकर चालकांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT