Nashik : पार्किंगमध्ये खेळताना कारखाली चिरडल्या गेलेल्या 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगा त्याच्या वडिलांसोबत हॉटेलमध्ये आला होता. त्याचे वडील व्यवसायाने ड्रायव्हर आहेत आणि ते त्यांच्या काही ग्राहकांना हॉटेलमध्ये सोडण्यासाठी तिथे पोहोचले होते.

Mumbai Tak

मुंबई तक

07 Feb 2025 (अपडेटेड: 07 Feb 2025, 10:14 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नाशिकमध्ये 4 वर्षांच्या मुलाचा पार्किंगमध्ये चिरडला गेल्या मृत्यू

point

वडील मोबाईलमध्ये बघत असतानाच पळाला मुलगा

point

मुलगा पळत पळत थेट कारसमोर गेला

नाशिकमध्ये काल एक दुर्दैवी अपघात घडला आहे. हॉटेलच्या पार्किंगमध्ये कारखाली चिरडल्या गेल्यानं एका चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी संध्याकाळी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाजवळील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे.

हे वाचलं का?

अपघात कसा झाला?

नाशिकमधील या अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये एक चार वर्षांचा मुलगा गाडीखाली चिरडला गेल्याचं दिसलंय. एक चालक कार पार्क करत असताना चिमुकला गाडीतून खाली उतरून खेळत होता. त्यानंतर चालकही मोबाईलमध्ये बघत बघत गाडीच्या बाहेर आला. तेवढ्यात एक दुसरी कार या कारच्या मागून जात असताना मुलगा अचानक कारसमोर आल्यानं तो टायरखाली चिरडला गेला. 

हे ही वाचा >> Sangli : चिमुकलीवर बलात्कार केला, हत्या करून मृतदेह लपवला, आरोपीने कुटुंबासमोर मुलीला शोधण्याचं नाटकही केलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगा त्याच्या वडिलांसोबत हॉटेलमध्ये आला होता. त्याचे वडील व्यवसायाने ड्रायव्हर आहेत आणि ते त्यांच्या काही ग्राहकांना हॉटेलमध्ये सोडण्यासाठी तिथे पोहोचले होते. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर, जेव्हा वडिलांनी गाडी पार्क केली. त्यानंतर ही घटना घडली.

दरम्यान, या अपघातानंतर आरोपी कार चालक घटनास्थळावरून निघून गेला अशी माहिती आहे. कारच्या धडकेत मुलाला गंभीर दुखापत झाली, त्यानंतर त्याचे वडील आणि हॉटेल सुरक्षा रक्षकांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेची माहिती मिळताच इंदिरा नगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि फरार आरोपी चालकाचा शोध सुरू आहे.

हे ही वाचा >> Nagpur : ऑनलाईन गेम खेळताना झालं 40 हजार कर्ज, जिथं काम करत होता तिथंच तरूणानं केली चोरी, कसा सापडला?

या दुर्दैवी अपघातानंतर हॉटेलच्या पार्किंग आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पार्किंग क्षेत्रात पुरेसे सुरक्षा उपाय नसल्यामुळे असे अपघात होऊ शकतात असं लोक म्हणतायत. तर दुसरीकडे मोबाईलवर बघत बघत मुलाकडे दुर्लक्ष केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय. त्यामुळे अशा ठिकाणी मुलांची काळजी घेणंही तेवढंच महत्लाचं आहे.

    follow whatsapp