56 ब्लेड गिळणारा ‘हा’ आहे तरी कोण?, डॉक्टरांनी ‘असे’ वाचवले प्राण

मुंबई तक

15 Mar 2023 (अपडेटेड: 23 Mar 2023, 08:09 PM)

56 shaving blade found in stomach : देशातील तरूणाई आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलत असल्याच्या अनेक घटना दररोज समोर येत असतात.अशाच आत्महत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणाने (Boy)शेविंग करणारी 56 ब्लेड (Shaving Blade) गिळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. मित्रांनी त्याला वेळेत रूग्णालयात (Hospital) दाखल केल्याने […]

Mumbaitak
follow google news

56 shaving blade found in stomach : देशातील तरूणाई आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलत असल्याच्या अनेक घटना दररोज समोर येत असतात.अशाच आत्महत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणाने (Boy)शेविंग करणारी 56 ब्लेड (Shaving Blade) गिळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. मित्रांनी त्याला वेळेत रूग्णालयात (Hospital) दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले होते. (56 shaving blades in boy stomach doctor are shocked after this found rajasthan jalore case)

हे वाचलं का?

…म्हणून उचलंल टोकाचं पाऊल

बालाजी नगरमध्ये 26 वर्षीय तरूण यशपाल राव आपल्या चार मित्रांसोबत राहत होता. एका प्राईवेट कंपनीत (Private company) तो काम करत होता. या कंपनीतील कामामुळे तो त्रासलेला होता. या त्रासातूनच त्याने शेविंग ब्लेडचे 56 ब्लेड गिळून आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचललं होतं. या घटनेनंतर त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. घटने दरम्यान त्याचे मित्र घरी नव्हते.

हनीमूनच्या रात्री नवरीला आला कॉल, काही तासाने सापडला नवऱ्या मुलाचा मृतदेह

रविवारी यशपालचे चारही मित्र घराबाहेर गेले होते. याच वेळेचा फायदा उचलंत यशपालने एकत्र तीन पॅकेट गिळले होते. या घटनेनंतर त्यांची तब्येत इतकी बिघडली की त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या.यानंतर त्याने मित्रांना फोन करून घरी बोलावले होते.त्यानंतर त्याला मनमोहन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथून दुसऱ्या रूग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता.

Crime : शारीरिक संबंधांसाठी पत्नीचा नकार; नशेत पतीनं केलं भयंकर कृत्य

पोटात 26 ब्लेड सापडले

रूग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी (Doctor) उपचार सुरु केले. ड़ॉक्टरांनी सुरूवातीला यशपालचा एक्सरे आणि सोनोग्राफी काढली.या सोनोग्राफीत त्यांच्या नजरेस धक्कादायक बाब पडली. रूग्णाच्या पोटात ब्लेडचे तुकडेच तुकडे दिसत होते. त्यानंतर यशपालवर तज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

7 डॉक्टरांच्या टीमकडून ऑपरेशन

यशपालच्या शरीराच्या आतला भाग खुपच डॅमेज झाला होता.त्याची तब्येत खुपच नाजूक होती. त्यामुळे डॉक्टरांनी टीम नेऊन त्याचे प्राण वाचवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार डॉक्टरांनी 7 जणांची टीम तयार करून रूग्णावर उपचार केले.तब्बल 3 तास तरूणावर उपचार करण्यात आले. या उपचारा दरम्यान तरूणाच्या पोटातून 56 ब्लेड बाहेर काढले गेले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

Akal Takht Express : विमानानंतर ट्रेनमध्ये विकृत कृत्य, टीसीकडून महिला प्रवाशावर लघवी

राजस्थानच्या जालौरमध्येही घटना घडली आहे. ही घटना वाचून अनेकांना धक्का बसला आहे.

    follow whatsapp