National Film Awards: अजय देवगण सर्वोत्कृष्ट अभिनेता, ‘तान्हाजी’ला लोकप्रिय हिंदी सिनेमाचा पुरस्कार

मुंबई तक

• 01:45 PM • 22 Jul 2022

६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अजय देवगण सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे. तर अजय देवगणच्याच तान्हाजी या सिनेमाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तान्हाजी हा सिनेमा नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित होता. या सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं होतं. अजय देवगणने या सिनेमात तान्हाजी ही भूमिका साकारली होती. तर शरद केळकर […]

Mumbaitak
follow google news

६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अजय देवगण सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे. तर अजय देवगणच्याच तान्हाजी या सिनेमाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तान्हाजी हा सिनेमा नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित होता. या सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं होतं. अजय देवगणने या सिनेमात तान्हाजी ही भूमिका साकारली होती. तर शरद केळकर या अभिनेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.

हे वाचलं का?

अजय देवगण सर्वोत्कृष्ट अभिनेता, तान्हाजी लोकप्रिय सिनेमा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

तान्हाजी सिनेमाचं दिग्दर्शन मराठमोळ्या ओम राऊतने केलं होतं. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगणला तर लोकप्रिय सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार तान्हाजी या सिनेमाला जाहीर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्याची गाथा सांगणारा सिनेमा आहे. या सिनेमात सैफ अली खान उदयभानाची भूमिका साकारली होती.

‘तान्हाजी’ सिनेमाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार पटकावले आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मराठमोळ्या ओम राऊतने सांभाळली होती. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ओम राऊत आनंद व्यक्त करत म्हणाला,’तान्हाजी’ या सिनेमाला दोन पुरस्कार जाहीर झाल्याचा खूप आनंद होत आहे. आपल्या सिनेमाला पुरस्कार मिळणं हे खूप अभिमानास्पद आहे. शिवरांच्या मावळ्याची गाथा रुपेरी पडद्यावर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. बॉक्स ऑफिसवरदेखील या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता”.

‘तान्हाजी’ हा सिनेमा हिंदवी स्वराज्याचे सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ल्यावर गाजवलेल्या अतुलनीय शौर्याची कथा सादर करतो. कोंढाणा काबीज करण्यासाठी आपल्या घरातलं लग्न लांबणीवर टाकणारे, शिवरायांच्या शब्दासाठी, स्वराज्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असणारे लढवय्ये तानाजी मालुसरे युद्धकलेत निपुण होतेच पण डाव प्रतिडाव आखण्यातही तरबेज होते. अशा अनेक गोष्टी ‘तान्हाजी’ या सिनेमात दाखवण्यात आल्या आहेत.

    follow whatsapp