ADVERTISEMENT
ऑस्कर 2023 मध्ये दीपिका पदुकोणने ही लाइमलाइटमध्ये आहे. या कार्यक्रमात दीपिकाचा ब्लॅक बोल्ड लूक पाहाण्यासारखा होता.
सोशल मीडियावर दीपिकाच्या लुकचे खूप कौतुक होत आहे. यावेळी दीपिका खूपच सुंदर दिसत होती.
दीपिकाने लुई व्हिटॉनचा मखमली काळा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता. त्यावर साजेसा डायमंड नेकलेस, अंगठी आणि ब्रेसलेट कॅरी केला होता.
दीपिकाने लाइट मेकअप, विंग्ड आयलायनर आणि हेअर बन करून लूक पूर्ण केलेला. पण तिच्या कानामागे असलेल्या टॅटूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
दीपिकाच्या कानामागे 82°E हा टॅटू होता. तो टॅटू पाहून सर्व चकित झले.
82°E हा स्किनकेअर ब्रँड आहे ज्याची दीपिका सह-संस्थापक आहे.
दीपिकाने ऑस्करच्या मंचावर तिच्या स्किनकेअर ब्रँडची टॅटूतून जाहिरात केली आहे.
ADVERTISEMENT