पोटच्या मुलाने आपल्या 85 वर्षे वयाच्या वडिलांना चाकूचे वार करून आणि डोक्यात वरंवटा घालून संपवलं आहे. पुण्यातल्या राजगुरू नगर मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या हत्येचं कारण काय ते अद्याप समजू शकलेलं नाही. जानेवारी महिना सुरू होऊन अवघे सात दिवस झाले आहेत. सात दिवसात जन्मदात्याची हत्या केली गेल्याची ही पुण्यातली तिसरी घटना आहे.
ADVERTISEMENT
बीड: खळबळजनक… 6 वर्षाच्या बालकाची गळा चिरून निर्घृण हत्या
46 वर्षांच्या माणसाने त्याच्या 85 वर्षांच्या वडिलांची चाकूचे वार आणि डोक्यात वरंवटा घालून हत्या केली. आधी या मुलाने वडिलांवर चाकू हल्ला केला. त्यानंतर डोक्यात वरंवटा घालून त्यांना संपवलं. या घटनेमागे नेमकं काय कारण आहे हे अद्याप समजलेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणी मुलाला ताब्यात घेतलं आहे. शंकर बोऱ्हाडे असं मृत 85 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तर त्यांचा मुलगा शेखऱ बोऱ्हाडेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घरगुती वादातून ही हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी लावला आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.
चार महिन्यापूर्वी बेपत्ता झाला तरूण, चुलत भावानेच खून करून मृतदेह शेतात पुरल्याची धक्कादायक बाब उघड
दोन दिवसांपूर्वी जमिनीच्या वादातून जन्मदात्या आईची हत्या करून वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना पुण्यातल्या इंदापूरमध्ये उघडकीस आली होती. आई वडील हे मागितलेले पैसे देत नाहीत या कारणाने हा हल्ला करण्यात आला होता असा आऱोप झाला होता.
पुण्यातल्या धनकवडी भागात 42 वर्षांच्या एका माणसाने प्लास्टिकच्या पिशवीत डोकं घालून आईचा जीव घेतला. श्वास गुदमरल्याने या महिलेला प्राण गमवावे लागले. नव्या वर्षाच्या पहिल्या सात दिवसात जन्मदात्यांच्या हत्येच्या तीन वेगळ्या घटनांनी पुणे शहर हादरलं आहे. पुणे शहरात नेमकं चाललंय काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
ADVERTISEMENT