मुंबईतल्या घाटकोपरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

मुंबई तक

• 09:10 AM • 03 Jan 2022

मुंबईतल्या घाटकोपर येथे कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही भीषण आग नेमकी का लागली त्याचं कारण नेमके कारण अद्याप समजले नाही. मात्र या गोदामातून धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. या आगीचा एक व्हिडीओ सध्या समोर आला असून त्यावर या घटनेच्या […]

Mumbaitak
follow google news

मुंबईतल्या घाटकोपर येथे कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही भीषण आग नेमकी का लागली त्याचं कारण नेमके कारण अद्याप समजले नाही. मात्र या गोदामातून धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. या आगीचा एक व्हिडीओ सध्या समोर आला असून त्यावर या घटनेच्या भीषणतेचा अंदाज लावला जात आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार घाटकोपर परिसरात एक कपड्यांचा गोदाम आहे. याच गोदामाला आज सकाळी अचानकपणे आग लागली आहे. कपड्यांचा गोदाम असल्यामुळे त्याला काही क्षणात आग लागली. ही आग आता मोठ्या प्रमाणात पसरली आहे. आग नेमकी का लागली, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आकाशातील धुराचे लोट पाहून गोदामाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी अग्निशमन दलाला तातडीने कळवले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

या ठिकाणी दर वर्षी एकदा तरी आग लागतेच. स्थानिक कार्यकर्ते आणि मुंबई महापालिका तसंच अग्निशमन दलाने पोहचून आग नियंत्रणात आणली आहे. सिलिंडर काढण्यात आले. घरातलं सामान बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे लोकांचा जीव गेला नाही. मात्र या ठिकाणी फायरची काही व्यवस्था नाही. जे रहिवासी आहेत त्यांचा जीव धोक्यात जातो या घटना दरवर्षी घडतात. मात्र लोक ऐकत नाहीत ते इथे जीव मुठीत धरून राहतात असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

    follow whatsapp