friend attack on best friend private part : मित्र मित्र असतो, मित्राची जागा कोणीच घेऊ शकत नाही,असं अनेकदा म्हटले जाते. आणि ते खरोखरंच आहे देखील. कारण मैत्रीचे नातेचं वेगळे आहे. मात्र या घटनेत मित्रानेच मित्राचा घात केल्याची घटना घडली आहे. मित्र झोपला असताना आरोपीने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. हा हल्ला करून आरोपी मित्राने पळ काढला होता.त्यामुळे हल्ला झालेला मित्र विव्हळत पडला होता. मित्राने नातेवाईकांना याची माहिती दिल्यानंतर त्याला रूग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. सध्या त्याच्यावर उपचार पार पडले असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकरणात आता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी मित्राचा शोध घेतला जात आहे. (a friend who attack on best friend private part odisha shocking story)
ADVERTISEMENT
केंद्रपाडा जिल्ह्यातील बालीपटनाचे रहिवाशी भागवत दास आणि अक्षय हे जिगरी मित्र (Best friend) होते. दोघांनी रविवारी फिरण्याचा प्लॅन केला होता. त्यानुसार रविवार उजाडला आणि दोघेही घराबाहेर पडले होते.अक्षयने भागवतला पेठाच्या समुद्र किनाऱ्यावर (Beach) नेले होते. या समुद्र किनाऱ्यावर दोघांनी खुप वेळ घालवला, मजा मस्ती केली होती.
हे ही वाचा : पती झोपलेला.. बायको घरात परपुरुषासोबत नको त्या अवस्थेत; झोपेतून उठताच…
दोघेनंतर पोटभरून जेवले आणि झोपी गेले होते.भागवतला लवकर झोप आली होती. याचाच फायदा उचलत अक्षयने भागवतच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला.या हल्ल्यात भागवत गंभीर जखमी झाला होता. हा हल्ला करून अक्षयने घटनास्थळावरून पळ काढला होता. त्यावेळेस भागवत हल्ल्याने विव्हळत पडला होता. या घटनेनंतर अक्षयने आपल्या जवळच्य़ा नातेवाईकांना या घटनेची माहिती देत, मदतीसाठी बोलावले होते.
नातेवाईकांनी घटनास्थळी पोहोचताच पाहिले की,भागवत बेशुद्ध पडला होता, त्याच्या शरीरातून खुप जास्त रक्त वाहून गेले होते. त्यामुळे नातेवाईकांनी तत्काळ भागवतला जवळच्या रूग्णालयात दाखल केले होते. मात्र भागवतची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी (Doctor)त्यांना कटकच्या एससीबी हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला होता. यानंतर नातेवाईकांनी त्याला रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर यशस्वी उपचार केले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा : बेबी बंप नाही, पीरियड्स होते सुरू… महिलेची अचानक बाथरूममध्येच झाली डिलिव्हरी!
दरम्यान या घटनेनंतर भागवतच्या काकांनी आरोपी अक्षय विरूद्ध तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिस आरोपी मित्राचा शोध घेतला आहे. तसेच नेमकं असं काय कारण होत की अक्षयलाच भागवतवर हल्ला करायची वेळ आली होती,याचा शोध घेतला जात आहे. ओरीसामध्ये ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण राज्य हादरलंय.
ADVERTISEMENT