Crime : सोशल मिडीयावर मैत्री, दारु पाजून बलात्कार, अन् धर्मांतर करुन लग्न…

मुंबई तक

16 Mar 2023 (अपडेटेड: 23 Mar 2023, 08:09 PM)

Crime News in india | Love Jihad : फतेहपूर : उत्तर प्रदेशमधील फतेहपूरमध्ये लव्ह जिहादची (Love Jihad) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात बलात्कार, अल्पवयीन मुलीशी लग्न, बळजबरीने धर्मांतर, फसवणूक असे अनेक आरोप या मुलावर करण्यात आले आहेत. याप्रकरणात पीडित तरुणी मागील दोन महिन्यांपासून पोलिस अधिकाऱ्यांच्या दारात चकरा मारत असल्याचही समोर आलं आहे, […]

Mumbaitak
follow google news

Crime News in india | Love Jihad :

हे वाचलं का?

फतेहपूर : उत्तर प्रदेशमधील फतेहपूरमध्ये लव्ह जिहादची (Love Jihad) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात बलात्कार, अल्पवयीन मुलीशी लग्न, बळजबरीने धर्मांतर, फसवणूक असे अनेक आरोप या मुलावर करण्यात आले आहेत. याप्रकरणात पीडित तरुणी मागील दोन महिन्यांपासून पोलिस अधिकाऱ्यांच्या दारात चकरा मारत असल्याचही समोर आलं आहे, मात्र तिला एकदाही न्याय मिळाला नाही. (A sensational case of love jihad has come to light in Fatehpur, Uttar Pradesh.)

याबाबत मिळालेली माहिती अशी की, खाखरेरु पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या राशिद खानने 17 वर्षीय पीडित तरुणीशी हिंदू बनून सोशल मिडीयावर मैत्री केली. हळू हळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं अन् एक दिवस त्याने तिला घरी बोलावलं. यावेळी तरुणाने त्या अल्पवयीन मुलीला कोल्ड्रिंकमधून दारु पाजली अन् तिच्यावर बलात्कार केला. या दरम्यान, तिचे व्हिडीओ बनवले आणि फोटोही काढले. यानंतर संबंधित तरुणाने तिच्याकडे पैशांची मागणी सुरु केली. त्यावेळी पीडित तरुणीने वडिलांचे चार लाख रुपये संबंधित तरुणाला दिले.

Crime: पिंपरीतील कुख्यात गुंड बाळा वाघेरेला पोलिसांनी घरातून उचललं, नेमकं प्रकरण काय?

गरोदर असताना जबरदस्तीने धर्मांतर :

यानंतरही रशीदने पीडित तरुणीला ब्लॅकमेल करणं थांबवलं नाही. याला वैतागून पीडितने संबंधित तरुणाच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांना सर्व काही सांगितलं. त्यावर त्याच्या कुटुंबीयांनी 2 वर्षांपूर्वी समजूत घालून तिला मुलासह गुजरातला पाठवलं. मी तिथे गरोदर राहिल्यावर मला माझा धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडलं आणि सपनावरून बदलून माही खान असे ठेवलं. आता कुटुंबीय हुंड्याची मागणी करत आहेत, असा आरोप पीडितेने केला आहे.

Crime : प्रेयसीसोबत रात्रभर लैंगिक संबंध अन् सकाळी सापडला मृतदेह…

दरम्यान, पीडित तरुणी आरोप करताना पुढे म्हणाली, एसपीकडे गेली तेव्हा त्यांनी गुजरातला जाण्यास सांगितलं, तिथे ही घटना घडली. पण ही घटना इथे घडल्याचं सांगितल्यावरही दखल घेतली गेली नाही. तिथून आयुक्तालयात जा म्हणाले. तिथे गेल्यावर पोलीस स्टेशनला जा म्हणाले. न्याय कुठेच मिळाला नाही, असंही ती म्हणाली. मात्र आता स्थानिक पोलिसांना तपास करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती आहे.

    follow whatsapp