Rani Mukerji Controversy : एका Kiss मुळे मोडलेलं राणी-अभिषेक बच्चनचं लग्न?

मुंबई तक

• 06:19 AM • 21 Mar 2023

Rani mukerji AbhisheK Bachchan Breakup : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani mukerji birthday) ही आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे.या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडसह विविध स्तरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राणी एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिचे लग्न होऊन सुद्धा ती अनेक सिनेमात अभिनयाचा ठसा उमटवते आहे.बॉलिवूडमध्ये करिअर करताना राणी मुखर्जी अनेकदा वादात सापडली होती. यातील एक […]

Mumbaitak
follow google news

Rani mukerji AbhisheK Bachchan Breakup : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani mukerji birthday) ही आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे.या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडसह विविध स्तरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राणी एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिचे लग्न होऊन सुद्धा ती अनेक सिनेमात अभिनयाचा ठसा उमटवते आहे.बॉलिवूडमध्ये करिअर करताना राणी मुखर्जी अनेकदा वादात सापडली होती. यातील एक वाद जाणून घेऊयात.ज्यामुळे तिचे अभिषेक बच्चन सोबतच लग्न मोडलं होतं.सिनेमातील एका सीनमुळे जया बच्चनने अभिषेक बच्चन (abhishek bachchans) आणि राणी मुखर्जीचं लग्न मोडलं होते. हा सीन नेमका कोणता होता? आणि कोणत्या अभिनेत्यासोबत तो शुट केलेला हे जाणून घेऊयात. (a kiss become the reason for rani mukerji abhishek bachchans breakup bollywood controversy)

हे वाचलं का?

अमिताभला केला होता किस्स

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ब्लॅक या सिनेमात एकत्र झळकले होते.या सिनेमात राणी मुखर्जीने (Rani mukerji) अमिताभ बच्चनला म्हणजेच खऱ्या आय़ुष्यात होणाऱ्या सासऱ्याला किस्स केला होता.संजय लीला भंसालीचा हा सिनेमा होता.या सिनेमात दोघांनी उत्कृष्ट अभिनय केला होता.हा त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.या सिनेमातील उत्कृष्ट कथानक आणि अभिनयामुळे हा सिनेमा हिट ठरला होता.या सिनेमात सर्व काही ठिक होते.मात्र जया बच्चन यांनी या सिनेमातील एका सीनवर आक्षेप होता. हा सीन पुर्ण झालाच मात्र त्यामुळे दोन जणांचे हृदय तुटले होते.

हिंदू देवी-देवतांचा अपमान?, बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सापडली वादात

सिनेमात राणी मुखर्जीला (Rani mukerji) अमिताभ बच्चनला किस्स करायचे होते. या सीनसाठी राणी मुखर्जीची तयारी होती, मात्र जया बच्चनचा आक्षेप होता.त्यांची होणारी सुन मोठ्या पडद्यावर सासऱ्यालाच किस्स करते हे त्यांना पाहायचे नव्हते.त्यामुळे त्यांचा आक्षेप होता. मात्र राणीच्या होकारानंतर हा सीन शुट झाला होता. या शुटनंतर मात्र राणीला आणि अभिषेक बच्चनला वेगळे व्हावे लागले होते.

हिंदू देवी-देवतांचा अपमान?, बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सापडली वादात

जया बच्चनच्या नाराजीनंतर अभिषेकचे लग्न अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत लावण्यात आले होते.या लग्नाचे निमंत्रण राणी मुखर्जीला (Rani mukerji) देण्यात आले नव्हते.यानंतर राणी मुखर्जीने नाराजी व्यक्त करत मला वाटले आम्ही चांगले मित्र आहोत पण आम्ही को स्टार निघालो अशी तिखट प्रतिक्रिया दिली होती.अभिषेक बच्चनशी ब्रेक अप झाल्यानंतर राणी मुखर्जीने यशराज फिल्मचे मालक आदित्य चोपडा सोबत लग्न केले होते.

दुसरी पत्नी हेलनला घरी आणलं तेव्हा वडिलांनी सलमान-अरबाजला एकच सांगितलेलं..

राणी मुखर्जीच्या (Rani mukerji) वर्कफ्रंटबद्दल बोलायच झालं तर नुकताच तिचा मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाला आयएमडीकडून खुप चांगली रेटींग देण्यात आली आहे.या सिनेमातील राणीचा अभिनय प्रेक्षकांना आवडला आहे.या चित्रपटाची चर्चा आहे.

    follow whatsapp