दिल्लीतल्या इस्रायली दुतावासाजवळ स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे चार ते पाच कार्सचं नुकसान झालं आहे. या घटनेत या उभ्या असलेल्या कार्सच्या काचा फुटल्या आहेत. या घटनेत अद्याप कुणीही जखमी झाल्याचं वृत्त अद्याप आलेलं नाही. हा स्फोट फूटपाथजवळ झाला आहे असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
इस्रायली दुतावासापासून 150 मीटर अंतरावर हा स्फोट झाला आहे. अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झाली आहे. दिल्ली पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम रोडवर इस्रायली दुतावास आहे. संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास आम्हाला स्फोट झाल्याची माहिती मिळाली असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे. त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहचलो. आता या घटनेचा तपास आम्ही सुरु केला आहे असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT