पुणे: पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाने फेसबुकवर ‘बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी’ अशी पोस्ट लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्राध्यापकाने विहिरीत उडू मारून आत्महत्या केली असल्याची माहिती मिळते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल दादाजी मेश्राम (वय 45) कात्रज येथे राहणाऱ्या या प्राध्यापकाने केलेल्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परीसरात राहणारे प्रफुल्ल दादाजी मेश्राम हे एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करीत होते. ते नुकतेच एका आजारातून बरे होऊन बाहेर पडले होते. त्यानंतर सर्व ठीकठाक सुरू होते. मात्र मागील काही दिवसात प्रफुल्ल हे मानसिक तणावात होते. ते कोणासोबत बोलत नव्हते.
त्याच दरम्यान त्यांनी काल दुपारच्या सुमारास ‘बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी’, अशी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आणि पुरंदर येथील भिवरी गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत उडून मारून आत्महत्या केली.
नेमकी काय लिहलं होतं फेसबुक पोस्टमध्ये?
‘बाय.. बाय डिस्प्रेशन… हा माझा निर्णय आहे. यासाठी कोणालाही जबाबदार धरु नका. लव्ह यू गुड्डी, सॉरी… मी अपयशी ठरलो…’ अशी आशयाची पोस्ट प्रफुल्ल मेश्राम यांनी लिहली होती.
ही पोस्ट त्यांच्या मित्र परिवाराने वाचताच, त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला काही समोरून प्रतिसाद मिळत नव्हता. या प्रकारामुळे सर्वांनी शोधाशोध सुरू केली. अखेर याबाबत पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली.
याच दरम्यान, एका व्यक्तीने विहिरीत उडी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना गाडी, चावी, पाकिट आणि रुमाल ठेवल्याचे दिसून आले. त्या वस्तूंची पाहणी केल्यावर संबंधित व्यक्ती प्रफुल्ल मेश्राम असल्याचे समजले.
त्यानंतर पोलिसांनी याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना दिली. प्रफुल्ल यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, प्रफुल्ल मेश्राम यांच्या आत्महत्येचं नेमकं काय कारण आहे त्याबाबत पोलीस तपास करत आहेत. मात्र, याप्रकरणी पोलीस आता वेगवेगळ्या बाजून तपास देखील करत असल्याचं सासवड पोलिसानी सांगितले आहे.
एका प्राध्यापकाने अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचलल्याने त्यांच्या कॉलेजमधील सहकारी प्राध्यापकांसह त्यांच्या कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT