कोरोनाशी लढण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र आहे ते म्हणजे लस. पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्युटने आणखी एका लसीची घोषणा केली आहे. कोव्हिशिल्ड या लसीची निर्मिती सिरमकडून करण्यात येतेच आहे. आता कोव्होव्हॅक्स हे आणखी एक व्हॅक्सिन सिरम घेऊन येत आहे. क्लिनिकल ट्रायलमध्ये ही लस 90 टक्के प्रभावी असल्याचं स्पष्ट कऱण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
या लसीचं ब्रिजिंग ट्रायलही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आता आपल्या देशात आता कोरोनाला प्रतिबंध करणारी आणखी लस उपलब्ध होणार आहे. देशातल्या लहान मुलांवरही कोव्होव्हॅक्सची चाचणी केली जाणार आहे. या आठवड्यात पहिल्या बॅचची निर्मिती होणार असल्याचं अदर पूनावाला यांनी ट्विट करून सांगितलं आहे.
‘पुण्यातील संस्थेत या आठवड्यात कोव्होव्हॅक्सच्या पहिल्या बॅचची निर्मिती होताना पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. या लसीत 18 वर्षांहून कमी वयाच्या आपल्या भावी पीढीचं संरक्षण करण्याची क्षमता आहे. लसीची ट्रायल अद्याप सुरू आहे. वेल डन टीम सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
अदर पूनावाला, सिरम इन्स्टिट्युट
गरजू,गरीब लोकांचं मोफत लसीकरण व्हावं यासाठी लता मंगेशकरांनी सुरू केला ‘श्रीमंगेश व्हँक्सिन फंड’
अमेरिकेचे बायोटेक्नोलॉजी कंपनी ‘नोव्हाव्हॅक्स’कडून गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी करोना लशीसंदर्भात करार करण्यात आला होता. ‘नोवावॅक्स’ची करोना प्रतिबंधक लस भारतात ‘कोव्होव्हॅक्स’ नावानं ओळखली जाणार आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत ही लस भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यापासून सिरम इन्स्टिट्यूटकडून अॅस्ट्रेझेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या ‘कोव्हिशिल्ड’ या करोना लसीची निर्मिती सुरू आहे. याशिवाय ‘भारत बायोटेक’ची ‘कोव्हॅक्सिन’ आणि रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ या लशींचाही करोना लसीकरण मोहिमेत मोलाचा वाटा आहे.
Covishield: लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविणे धोकादायक? पाहा सरकारचं स्पष्टीकरण
‘पुण्यातील संस्थेत या आठवड्यात कोव्होव्हॅक्सच्या पहिल्या बॅचची निर्मिती होताना पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. या लसीत 18 वर्षांहून कमी वयाच्या आपल्या भावी पीढीचं संरक्षण करण्याची क्षमता आहे. लसीची ट्रायल अद्याप सुरू आहे. वेल डन टीम सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ असं ट्विट करत अदार पूनावाला यांनी आपल्या टीमचं कौतुक केलंय. ही लस जर भारतात मिळू लागली तर भारतात मिळणाऱ्या लसींची संख्या चार होणार आहे. सध्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, सिरम इन्स्टिट्युटची कोव्हिशिल्ड आणि स्पुटनिक व्ही या लसी उपलब्ध आहेत. या लसींशिवाय आता कोव्होव्हॅक्स या लसीचाही पर्याय उपलब्ध होणार आहे.
ADVERTISEMENT