NIA ने दिलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार सचिन वाझे यांच्यासोबत मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये एका महिलेचा वावर होता असं कळतं आहे. एनआयएच्या सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार ट्रायडंट हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला दिसते आहे या महिलेच्या हातात नोटा मोजण्याचं मशीनही आहे. ही महिला नेमकी कोण याचा शोध घेतला जातो आहे मात्र तिच्या चेहऱ्यावर मास्क असल्याने तिची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत.
ADVERTISEMENT
ट्रायडंट हॉटेलचा एंट्रन्स, लॉबी, लिफ्ट असे सुमारे ३५ सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. सचिन वाझे आणि ही महिला १६ फेब्रुवारीला एकाच कारमध्ये सोबत येताना दिसत आहेत. मात्र आधी सचिन वाझे आतमध्ये जातात त्यानंतर ही महिला जाते असंही ट्रायडंट हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं आहे.
बनावट आधारकार्ड दाखवून मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत होते सचिन वाझे!
NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वाझे हे ट्रायडंट हॉटेलच्या १९ व्या मजल्यावर असलेल्या एका खोलीत वास्तव्य करत होते. टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीचा मालक सचिन वाझे यांच्या हॉटेलचं बिल भरत होता. NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाची ओळख पटली आहे त्याचीही चौकशी होऊ शकते. सचिन वाझे यांनी हॉटेलसाठी तीन पर्याय दिले होते असंही समजतं आहे. ज्या व्यापाऱ्याद्वारे सचिन वाझे रूम बुक करत होते. या रूमचं एका रात्रीचं भाडं हे १० ते १५ हजार रुपयांच्या घरात आहे. सचिन वाझेंनी मुंबईतल्या एका हॉटेलमधली एक रूम १०० दिवसांसाठी बुक करण्यास सांगितलं होतं. सचिन वाझेंचं १०० दिवसांचं बिलही एका व्यापाऱ्याला भरायला सांगितलं होतं. या बिलाचे पैसे घेऊन हा व्यापारी सचिन वाझेंना भेटला होता असंही NIA ने म्हटलं आहे.
ज्या महिलेसोबत सचिन वाझे यांचा वावर दिसला तिचं सीसीटीव्ही फुटेज जेव्हा सचिन वाझेंना दाखवण्यात आलं तेव्हा ती महिला कोण आहे हे ओळखण्यास सचिन वाझेंनी नकार दिला. ही महिला कोण ते आपल्याला ठाऊक नाही असं सचिन वाझेंनी म्हटल्याचंही एनआयएच्या सूत्रांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT