मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली, तर आठवडाभरात माझी बातमी दिसेल, ठाकरेंना सत्तारांचं चॅलेंज

मुंबई तक

• 08:56 AM • 01 Nov 2022

सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार शिंदे गटात गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांना आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचं आणि जिंकून दाखवण्याचं आव्हान दिलं. ठाकरेंच्या आव्हानावर सत्तारांनी फॉर्म्युला सांगितला आणि प्रतिआव्हानही दिलं. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विरोधकांकडून करण्यात आलेल्या ओला दुष्काळाच्या मागणीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले, “विरोधीपक्षाला […]

Mumbaitak
follow google news

सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार शिंदे गटात गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांना आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचं आणि जिंकून दाखवण्याचं आव्हान दिलं. ठाकरेंच्या आव्हानावर सत्तारांनी फॉर्म्युला सांगितला आणि प्रतिआव्हानही दिलं.

हे वाचलं का?

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विरोधकांकडून करण्यात आलेल्या ओला दुष्काळाच्या मागणीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले, “विरोधीपक्षाला काय बोलायचं, काय करायचं हे त्यांचं काम आहे. सत्ताधारीला सत्ता टिकवण्यासाठी बाकीच्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायच्या… नुकसान झालेला एकही शेतकरी सुटणार नाही.”

“आता ओला दुष्काळ जाहीर झाला, तर ३२ टक्के उसाचं क्षेत्र आहे. त्यांनाही द्यायचं का? त्यांना दिलं, तर ज्यांचं नुकसान झालंय त्यांचे काय हाल होतील?”, असा प्रतिप्रश्न सत्तारांनी उपस्थित केला.

Shiv Sena split : निकाल लांबणार? शिंदे-ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं?

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर सत्तार म्हणाले, “त्यांचा (आदित्य ठाकरे) दौरा पाहिला मी. त्यांच्या वडिलांचा (उद्धव ठाकरे) दौरा पाहिला. त्यांचे वडील औरंगाबादला आले होते. अडीच तासांचा दौरा. २४ मिनिटं शेतकऱ्यांच्या बांधावर. आम्ही २४ दिवसांपासून फिरतोय. ओला दुष्काळाची स्थिती दिसला नाही. यांना २४ मिनिटांत काय दिसलं असेल माहिती नाही”, असं अब्दुल सत्ता म्हणाले.

“राजकारणासाठी बांधावर जाऊन फोटो काढणं वेगळं आहे. ते स्वतः मुख्यमंत्री होते. २०१९ मध्ये घोषणा केली होती की, हेक्टरी ५० हजार द्यावेत. त्यांना आठवण राहिली नाही”, असं म्हणत अब्दुल सत्तारांनी उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यावर टीका केली.

फडणवीसांनी दाखवली सुभाष देसाईंची बातमी, आदित्य ठाकरे म्हणाले, ‘इतकं खोटं आजपर्यंत ऐकलं नाही’

आदित्य ठाकरेंना अब्दुल सत्तारांचं चॅलेंज

राजीनामा देऊन आमदारकीची निवडणूक लढवण्याच्या आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला उत्तर देताना सत्तार म्हणाले, “त्यांना मी बोललो होतो की, तुम्ही वरळीतून राजीनामा द्या. मी सिल्लोडमधून राजीनामा देतो. त्यांचं विधान होतं की, दोन वर्षांनंतर कळेल की निवडणूक काय असते. मी त्यांना म्हटलं की पहिला आपला ट्रायल मॅच होऊद्या. दूध का दूध पानी का पानी लगेच होऊन जाईल. त्यांनी नाही दिला राजीनामा आणि मला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली, तर आठवडाभराच्या आत माझी बातमी चॅनेलवर दिसेल (आमदारकीच्या राजीनाम्याची)”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

    follow whatsapp