शर्यतीदरम्यान बैलगाडी घुसली प्रेक्षकांमध्ये, तिघे जखमी; थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

मुंबई तक

• 07:31 AM • 03 Feb 2022

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीवरची बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली. यानंतर राज्यात विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतींना सुरुवात झाली आहे. यावेळी बैलगाडा मालकांमध्ये उत्साह संचारलेला पहायला मिळतो. रायगड जिल्ह्यातील नांदगाव येथे बैलगाडा शर्यतीदरम्यान एक अपघात झाला. शर्यतीदरम्यान एक बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसल्यामुळे तीन जण जखमी झाले आहेत. नांदगाव येथील भाजप पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमीत्त या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीवरची बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली. यानंतर राज्यात विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतींना सुरुवात झाली आहे. यावेळी बैलगाडा मालकांमध्ये उत्साह संचारलेला पहायला मिळतो. रायगड जिल्ह्यातील नांदगाव येथे बैलगाडा शर्यतीदरम्यान एक अपघात झाला.

हे वाचलं का?

शर्यतीदरम्यान एक बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसल्यामुळे तीन जण जखमी झाले आहेत. नांदगाव येथील भाजप पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमीत्त या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं.

बुधवारी संध्याकाळी घडलेल्या या अपघाताचा व्हिडीओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघातात तिघे जण जखमी झाल्याचं कळत असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

    follow whatsapp