Pune : पुणे शहरातील वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या स्वारगेट बस स्टँडवर उभ्या असलेल्या राज्य परिवहन शिवशाही बसमध्ये काल पहाटे 26 वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. गुन्हा केल्यानंतर आरोपी पळून गेला. महिलेनं पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, या प्रकरणातला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, तो फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
आरोपीवर 1 लाखांचं बक्षीस
हे ही वाचा >>Amravati : 22 दिवसांच्या बाळाला लोखंडी सळईने 65 चटके, श्वास घेता येत नव्हता म्हणून अंद्धश्रद्धेतून विचित्र प्रकार
पुणे झोन II च्या डीजीपी स्मार्तना पाटील यांनी या प्रकरणावर बोलताना सांगितलं की, "आरोपीने मास्क घातला होता, त्यामुळे त्याचा चेहरा ओळखता येत नव्हता, मात्र नंतर तो ओळखला गेला. आमची टीम लवकरच आरोपीला पकडून आणेल. जो कोणी आरोपीबद्दल माहिती देईल त्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस दिलं जाईल. बस फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. "एजन्सीनुसार, पोलिसांनी बुधवारी सांगितलं की, राष्ट्रीय महिला आयोगानं (NCW) पुण्यात पार्क केलेल्या राज्य परिवहन बसमध्ये 26 वर्षीय महिलेवर झालेल्या कथित बलात्काराची स्वतःहून दखल घेतली आहे. तसंच या प्रकरणात त्वरीत कारवाईचे निर्देश दिले आहेत. "
स्वारगेट पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्यानं माहिती देताना सांगितलं की, या प्रकरणातील आरोपीचं नाव दत्तात्रय गाडे असं आहे. आरोपीविरुद्ध आधीच चोरी आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी दत्तात्रेय गाडे याच्याविरुद्ध यापूर्वी शिरूर, शिक्रापूर आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल आहेत. स्वारगेट पोलिस ठाण्यात पाकिटे चोरीचा गुन्हा (आयपीसी ३७९) दाखल करण्यात आला. सध्या पुणे गुन्हे शाखेच्या 13 पथकं आरोपींचा शोध घेत आहेत आणि एक श्वान पथकही रवाना करण्यात आले आहे.
हे ही वाचा >> Solapur : प्रेयसीच्या पतीला मारण्याचा कट रचला, पण दारूच्या नशेत दोघंही तलावात बुडाले...
मंगळवारी सकाळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) स्वारगेट डेपोमध्ये घडलेल्या घटनेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलिस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे, असं एका अधिकाऱ्यानं सांगितले.
ADVERTISEMENT
