शहापूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. ज्यात २२ वर्षीय नराधमाने ७० आणि ७२ वर्षाच्या दोन वयोवृद्ध महिलांना आपल्या वासनेचं शिकार बनवलं आहे. शहापूर तालुक्यातील एका आदिवासी पाड्यात ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली असून भूषण हिंदोळे असं या नराधमाचं नाव आहे.
ADVERTISEMENT
या घटनेतील दोन्ही महिला या आदिवासी पाड्यातच राहतात. घटनेच्या वेळी म्हणजेच २० मार्चला घरात कोणीही नसल्याचं पाहून आरोपीने घरात प्रवेश केला आणि जिवे मारण्याची धमकी देत वयोवृद्ध महिलेवर बलात्कार केला. या घटनेमुळे पीडित महिला भयभीत झाली आणि आपल्या जिवाच्या भीतीने तिने याबद्दल वाच्यता केली नाही. याच गोष्टीचा फायदा घेत २१ मार्चला या आरोपीने याच पाड्यातील दुसऱ्या एका महिलेसोबत असचं कृत्य केलं.
Crime News : दिव्यांग मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत
या घटनेमुळे आदिवासी पाड्यात चांगलीच खळबळ उडाली. २३ मार्च रोजी या दोन्ही महिलांना वासिंद पोलिसांत या घटनेविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आरोपीला २५ मार्च रोजी वाशिंदमधील एका गावातून अटक केली.
मुंबई : प्रेयसी गावी जाऊन नये म्हणून त्याने घेतला ७ महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव
ADVERTISEMENT