सुमारे तीन वर्षांनी सुधा भारद्वाज तुरुंगातून बाहेर, मीडियाशी न बोलण्याचा कोर्टाचा आदेश

मुंबई तक

• 01:23 PM • 09 Dec 2021

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण आणि शहरी नक्षलवाद प्रकरणी NIA कोर्टाने अटक केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज या तब्बल तीन वर्षांनी तुरुंगाच्या बाहेर आल्या आहेत. आज दुपारच्या सुमारास त्या मुंबईतल्या भायखळा तुरुंगातून बाहेर आल्या. मागच्याच आठवड्यात सुप्रीम कोर्टाने सुधा भारद्वाज यांचा जामीन मंजूर केला होता. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयानंतर बुधवारी त्यांना एनआयए कोर्टासमोर हजर करण्यात […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण आणि शहरी नक्षलवाद प्रकरणी NIA कोर्टाने अटक केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज या तब्बल तीन वर्षांनी तुरुंगाच्या बाहेर आल्या आहेत. आज दुपारच्या सुमारास त्या मुंबईतल्या भायखळा तुरुंगातून बाहेर आल्या.

हे वाचलं का?

मागच्याच आठवड्यात सुप्रीम कोर्टाने सुधा भारद्वाज यांचा जामीन मंजूर केला होता. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयानंतर बुधवारी त्यांना एनआयए कोर्टासमोर हजर करण्यात आलं. एनआयए कोर्टाने त्यांच्यावर 16 अटी लादल्या असून 50 हजार रुपयांचा बॉन्ड भरुन घेतला. न्यायालयाच्या परवानगीशिवाय सुधा भारद्वाज यांना मुंबई सोडता येणार नाही असा आदेश देण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांना मुंबई हायकोर्टाने दिलेल्या जामीनाविरोधात एनआयएने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने एनआयएची याचिका फेटाळून लावली. मागील तीन वर्षांपासून भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आणि नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याच्या आरोपात सुधा भारद्वाज यांना एनआयएने अटक केली होती. बॉम्बे हायकोर्टाने सुधा भारद्वाज यांना Default Bail मंजूर केला. एनआयएने कायद्याने ठरवून दिलेल्या कालावधीत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे बॉम्बे हायकोर्टाने जामीन मंजूर केला.

कोण आहेत सुधा भारतद्वाज?

सुधा भारतद्वाज या अमेरिकेत जन्माला आल्या. त्या अकरा वर्षांच्या असताना भारतात आल्या. त्यांनी IIT मधून गणिताची पदवी घेतली. त्यांना परदेशातून पुढचं शिक्षण घेण्याची संधी होती पण त्यांनी तसं केलं नाही.

सुधा भारद्वाज यांच्यावर अर्बन नक्सल असल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांनी त्यांना भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात 6 जून 2018ला अटक केली. त्यांच्यासह अन्य काही वकील, लेखक आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आली होती.पुणे पोलीस या प्रकरणाची चौकशी करण्यात उशीर करत आहेत. त्यामुळे त्यांच्या एकूण कार्यपद्धतीवरच अनेक प्रश्नं उपस्थित होत होते.

काय घडलं होतं 2018 ला?

1 जानेवारी 2018 रोजी नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम सुरु असतानाच सणसवाडीत रस्त्यांवरील वाहनांवर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीत काही जण गंभीर जखमी झाले होते. यानंतर पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील दोन ते तीन दिवस सणसवाडीत तणावपूर्ण शांतता होती. मात्र, या घटनेचे पडसाद पुढील काही दिवसांमध्ये राज्याच्या अन्य भागांमध्येही उमटले. 1 जानेवारी 2018 ला भीमा कोरेगावच्या लढाईला 200 वर्ष पूर्ण झाली. ही लढाई इंग्रज आणि पेशवा दुसरा बाजीराव यांच्यात भीमा कोरेगाव या गावी झाली होती.

    follow whatsapp