कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट वेगाने येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आता अनेक बड्या लोकांनाही कोरोनाची लागण होत असल्याचं समोर येत आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आता बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सोमवारी त्याने सोशल मीडियावरून माहिती दिली. त्याच्यासह पत्नीलासुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं जॉनने सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
जॉन अब्राहमने सोमवारी इन्स्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून चाहत्यांना याची माहिती दिली. त्याने म्हटलं की, कोरोनाची लागण झाली असून रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यासह पत्नीसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आहे. तीन दिवसांपूर्वी एका व्यक्तीच्या संपर्कात आलो होते. संबंधित व्यक्तीला कोरोना झाल्याचं नंतर समजलं. तेव्हा आम्ही चाचणी केली आणि त्यात दोघांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही सध्या घरीच क्वारंटाइन असून कोणाच्याही संपर्कात नाही. दोघांनीही लस घेतली होती, सध्या सौम्य लक्षणे असून तुम्ही काळजी घ्या आणि मास्क घाला असंही आवाहन जॉन अब्राहमने केलं आहे.
ADVERTISEMENT