स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो या मालिकेतून किरण माने यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर आज किरण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांना आता व्यावसायिक कारणामुळे तुम्हाला काढण्यात आलं आहे त्यासाठी कोणतंही राजकीय कारण नाही असं सांगण्यात आलं आहे. मात्र आज शरद पवारांची भेट घेतल्यानंतर किरण माने यांनी सांस्कृतिक क्षेत्रात असं घडणं योग्य नाही असं म्हटलं आहे. तसंच मला ज्या प्रकारे काढून टाकण्यात आलं ती मला झुंडशाही वाटते असंही त्यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
राजकीय भूमिका घेतल्यामुळे अभिनेता किरण मानेला मालिकेतून काढलं? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
काय म्हणाले आहेत किरण माने?
‘देशात सांस्कृतिक क्षेत्र फार महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादा कलाकार एखादं भाष्य करतो तेव्हा ते फार लवकर समाजाता पोहचतं. सांस्कृतिक क्षेत्राने समाजात क्रांती घडवण्याचं काम केलं आहे. मुनव्वर फारुखीसारख्या कॉमेडियनचे प्रयोग बंद पाडले जातात कारण तो परखड भाष्य करतो. कुणाल कामरा जे बोलतो त्यावरून त्याला ट्रोल केलं जातं. अनेकांना त्याची भीती वाटते. कारण सांस्कृतिक क्षेत्रातून तुम्ही कोणतीही गोष्ट पटकन पोहचवू शकता. समाज भान असलेला नट फार गरजेचा असतो समाजासाठी. ऑक्सिजनसारखा असतो. तुमच्या जगण्यातल्या बऱ्याच गोष्टी तो मांडत असतो.’
‘मनोज कुमारचे सिनेमा येत होते तेव्हा महंगाई मार गयी सारखी गाणी यायची तेव्हा कुणी म्हणायचं नाही की सत्ताधाऱ्यांवर टीका केली. बेरोजगारीवर भाष्य करणारं तेरी दो टकिये की नोकरीमें मेरा लाखो का सावन जाए सारखं गाणं आलं होतं तेव्हाही कुणी त्यावर टीका केली नाही. मनोज कुमार भाजपचे होते. ते काँग्रेसच्या सरकारवर टीका करायचे. मात्र तेव्हा असं काहीही घडलं नाही दहशतवाद वगैरे. आता हे प्रमाण वाढलं आहे.’
‘आज शरद पवारांची मी भेट घेतली याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सांस्कृतिक क्षेत्राची इथ्यंभूत माहिती असणारे नेते म्हणजे शरद पवार. मी आज त्यांना भेटलो. त्यांना मी माझी बाजू सांगितली. मी माझी बाजू आज त्यांना सांगितली. मला चॅनलमधून कारण उशिरा सांगण्यात आलं. की ज्या सीरियलसाठी मी खूप योगदान दिलं त्या सीरियलमधून अशा पद्धतीने मला काढू नये. मला असं काढून टाकणं हे मला हे मला झुंडशाहीसारखं वाटतं. मागच्या आठ दिवसातल्या माझ्या पोस्ट पाहिल्या तर लिंक जोडून कुणीही सांगू शकतं की मला का काढण्यात आलं.’ असंही किरण माने यांनी सांगितलं. माझी पूर्ण बाजू शरद पवार यांनी ऐकून घेतली आहे. मी त्यांना जे काही सांगितलं आहे त्यावर ते विचार करतील आणि मला न्याय मिळवून देतील अशी खात्री वाटते असंही किरण माने यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT