Satish Kaushik Death: 15 कोटी रुपयांसाठी झाली सतीश कौशिकची हत्या?

मुंबई तक

13 Mar 2023 (अपडेटेड: 23 Mar 2023, 08:39 PM)

नवी दिल्ली: प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे 9 मार्चला निधन झाले होते. अचानक झालेल्या निधनानंतर अनेकांनी त्यांच्या मृत्यूबाबत संशय उपस्थित केला होता. तसेच ज्या मित्राच्या फार्म हाऊसवर कौशिक गेले होते त्या फार्म हाऊसचा मालक विकास मालू यांच्या पत्नीने सतीश कौशिक यांची हत्या (Murder) झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. या संशयानंतर आता […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली: प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे 9 मार्चला निधन झाले होते. अचानक झालेल्या निधनानंतर अनेकांनी त्यांच्या मृत्यूबाबत संशय उपस्थित केला होता. तसेच ज्या मित्राच्या फार्म हाऊसवर कौशिक गेले होते त्या फार्म हाऊसचा मालक विकास मालू यांच्या पत्नीने सतीश कौशिक यांची हत्या (Murder) झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. या संशयानंतर आता सतीश कौशिक प्रकरणात ट्विस्ट आला आहे. त्यामुळे पोलीस आता या दिशेनेही तपासाची चक्रे फिरवण्याची शक्यता आहे. (actor satish kaushik was murdered for 15 crores wife broke the silence told the truth)

हे वाचलं का?

सतीश कौशिक यांनी दिल्लीतील मित्र विकास मालू यांच्या फार्म हाऊसवर होळी साजरी केली होती. त्यानंतर अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. इतक्या मोठ्या अभिनेत्याच्या या अचानक झालेल्या निधनाने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला होता. तसेच तपासात पोलिसांनाही काही औषधेही सापडली आहेत. ही त्यांची नियमित औषधे होती की, इतर दुसरी काही याचा तपास केला जात आहे. यासह पोलिसांनी हृदयाचे आणि रक्ताचे रिपोर्टही काढले आहेत. यामधून काय समोर येते हे पाहावे लागणार आहे.

सतीश कौशिकांच्या हत्येचा कोणी व्यक्त केला संशय?

सतीश कौशिक यांच्या निधनाबाबत संशय व्यक्त होत असताना त्यांचे मित्र विकास मालू यांची पत्नी सान्वी यांनी खळबळजनक आरोप केला आहे. सतीश आणि विकास यांच्यामध्ये 15 कोटींच्या उधारीवरून भांडण सुरु होते. यामुळे विकासने सतीशला होळी पार्टीत चुकीच्या गोळ्या दिल्या असाव्यात. जेणेकरून त्यांना पैसे द्यावे लागणार नाही, असा आरोप सान्वीने केला. दिल्ली पोलिसांनी सान्वीच्या आरोपांची चौकशी सुरू केली आहे. शवविच्छेदनात मृत्यूचे कारण संशयास्पद नसल्याचं म्हटलं आहे. यामध्ये कार्डिअॅक अरेस्टची बाब समोर आली आहे. असे असले तरी दिल्ली पोलिसांना या प्रकरणातील प्रत्येक बाब तपासून पाहत आहे.

“रशियन गर्लला बोलवून सतीश कौशिकला ब्लू पिल्स देऊ” : महिलेच्या तक्रारीने खळबळ

सतीश कौशिक यांच्या पत्नीने खोटे ठरवले आरोप

विकास मालूची पत्नी सान्वी मालूच्या या खळबळजनक आरोपांवर आता सतीश कौशिक यांच्या पत्नीने मौन सोडले आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हत्या झाली नसल्याचं म्हटलं आहे. ती म्हणाली – हे खूप चुकीचे आहे. दोघांमध्ये कोणतेही भांडण झाले नव्हते. कोणताही वाद झाला नव्हता. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये 98% ब्लॉकेज असल्याचे स्पष्टपणे लिहिले आहे. त्यांना शुगर आणि डायझिनचे औषध दिले होते.

“माझ्या पतीनेच अभिनेते सतीश कौशिक यांची हत्या केली”, महिलेनं सांगितलं कारण

विकास मालूच्या पत्नीच्या दाव्यावर शशी कौशिक म्हणाली की, ‘ती आपल्या पतीपासून वेगळी झाली आहे, त्यामुळे हे सर्व सांगून ती सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. ती विकास मालू यांना गोवण्याचा प्रयत्न करत आहे.’ शशी कौशिक यांच्या म्हणण्यानुसार सतीश कौशिक यांच्या मृत्यूमागे पैशांचा कोणताही व्यवहार नव्हता.

सतीश कौशिक यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सतीश कौशिक यांना 11 वर्षांची मुलगी आहे. जिच्या लग्नाचे त्याने स्वप्न पाहिले होते. सतीश कौशिकच्या मॅनेजरने सांगितले की, सतीश यांना आपल्या मुलीसाठी जगायचे होते. मरण्यापूर्वी त्यांनी मॅनेजरला म्हटलं होतं की, ‘मला मरायचे नाही, मला वाचवा. मला वंशिकासाठी जगायचे आहे. मला वाटतं मी जगू शकेन. शशी आणि वंशिकाची काळजी घ्या.’

Satish Kaushik : फार्महाऊसवर सतीश कौशिक सोबत काय झालं? पोलिसांकडून चौकशी सुरू

    follow whatsapp