Adani Group : यूपी सरकारने दिला अदाणी ग्रुपला झटका

मुंबई तक

06 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:06 AM)

Adani Group hit by Uttar Pradesh government : हिंडेनबर्गच्या या रिपोर्टनंतर (Hindenburg Report) एकीकडे अदानी समूहाचे शेअर्स (Adani Group) पडले आहेत, तर दुसरीकडे आता उत्तर प्रदेश सरकारनेही (Uttar Pradesh Government) अदानी समूहाला दणका दिला आहे. अदानी ट्रान्समिशन, जीएमआर आणि इंटेली स्मार्ट कंपनीकडून प्राप्त प्रीपेड स्मार्ट मीटरची निविदा रद्द करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात 2.5 कोटी […]

Mumbaitak
follow google news

Adani Group hit by Uttar Pradesh government : हिंडेनबर्गच्या या रिपोर्टनंतर (Hindenburg Report) एकीकडे अदानी समूहाचे शेअर्स (Adani Group) पडले आहेत, तर दुसरीकडे आता उत्तर प्रदेश सरकारनेही (Uttar Pradesh Government) अदानी समूहाला दणका दिला आहे. अदानी ट्रान्समिशन, जीएमआर आणि इंटेली स्मार्ट कंपनीकडून प्राप्त प्रीपेड स्मार्ट मीटरची निविदा रद्द करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात 2.5 कोटी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याच्या निविदेची किंमत 25 हजार कोटी होती.

हे वाचलं का?

Adani Group : अदाणी ग्रुपच्या शेअर घसरणीत LIC ला फटका, 18 हजार कोटी…

मध्यांचल विद्युत वितरण निगमने निविदा रद्द केली आहे. फक्त मध्यांचल विद्युत वितरण निगमची 5454 कोटींची निविदा होती. निविदेची अंदाजे किंमत सुमारे 48 ते 65 टक्‍क्‍यांनी जास्त असल्याने सुरुवातीपासूनच विरोध होत होता. मीटरची किंमत सुमारे 9 ते 10 हजार रुपये होती, तर अंदाजे किंमत प्रति मीटर 6 हजार होती.

यामध्ये मेसर्स अदानी पॉवर ट्रान्समिशन व्यतिरिक्त, जीएमआर आणि इंटेली स्मार्ट कंपनीने टेंडरचा भाग 2 जिंकला होता आणि त्यांना काम करण्याचे आदेश दिले जाणार होते. राज्य ग्राहक परिषदेने महागडे मीटर बसविण्याबाबत बोलले होते आणि परिषदेने नियामक आयोगात याचिकाही दाखल केली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे ही तक्रार केली होती.

ग्राहक परिषदेकडून निविदा रद्द केल्याचे समर्थन

सर्व आरोपांदरम्यान मध्यांचल विद्युत वितरण निगमचे अधीक्षक अभियंता वित्त अशोक कुमार यांनी अदानी समूहाची निविदा रद्द केली. तांत्रिक कारणामुळे निविदा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. राज्य वीज ग्राहक परिषदेने निविदा रद्द करण्याचे समर्थन करत महागड्या निविदांद्वारे ग्राहकांवर अतिरिक्त बोजा पडणार असल्याचे सांगितले.

‘हा’ तोच माणूस… ज्याने Adani च्या साम्राज्याला सोडलंय हादरवून!

हिंडेनबर्गच्या रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?

1. जगातला तिसरा श्रीमंत व्यक्ती जगातली सर्वात मोठी चोरी करत आहेत. अकाऊंटिंग फ्रॉडचे आरोप

2. गेल्या 3 वर्षात उद्योगपती गौतम अदानींच्या संपत्तीत कमालीची वाढ

3. गेल्या 3 वर्षात गौतम अदानींना तब्बल 100 अब्ज डॉलरचा नफा झाला

4. 7 लिस्टेड कंपन्यांचे भाव तब्बल 819 टक्क्यांनी वाढले आहेत.

कोणत्या आहेत या कंपन्या?

1. अदानी पोर्ट्स

2. अदानी टोटल गॅस

3. अदानी एंटरप्रायझेस

4. अदानी ट्रांसमिशन

5. अदानी पॉवर

6. अदानी विल्मर

7. अदानी ग्रीन एनर्जी

रिपोर्टमध्ये असंही सांगितलंय की अदानी ग्रुपविरोधात तब्बल 17 अरब डॉलरच्या सरकारी फसवणुकीचा तपास झाला आहे, ज्यात मनी लाँड्रिंग, करचोरी आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत.

अदानी ग्रुपवर प्रचंड कर्ज आहे आणि अनेक शेअर्स त्यांनी गहाण ठेवले आहेत. पहिले अदानींचे शेअर्स 2 ते 3 वर्षात 3 हजार टक्क्यांनी वाढले आणि नंतर जेव्हा हेच शेअर्स गगनाला भिडले तेव्हा त्याच शेअर्सवर अदानी ग्रुपने कर्ज घेतली.

अदानींच्या कंपनीतील वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांमध्ये 22 पैकी 8 जण तर अदानी कुटुंबातलेच आहेत. ग्रुपच्या आर्थिक आणि महत्वाच्या निर्णयांमध्ये त्यामुळे अदानी कुटुंबीयांचाच कंट्रोल असतो.

    follow whatsapp