महाराष्ट्रातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम आठवडाभर थांबवावी लागणार अशी चिन्हं आहेत. कारण लसींची मागणी आणि केंद्राकडून होणारा पुरवठा यामध्ये अंतर पडलं आहे. सध्या दीड दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा शिल्लक आहे. 9 लाख लसी आत्ता महाराष्ट्रात आहेत, हा साठा दीड दिवसात संपेल. त्यानंतर केंद्र सरकार 15 एप्रिलपासून पुढील लसींचा साठा करणार आहे. 15 ते 20 एप्रिल या कालावधीत केंद्राकडून 17 लाख 43 हजार 280 लसींचा साठा केला जाणार आहे. मी आता आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहिणार आहे त्यात मी हे नमूद करणार आहे की 15 एप्रिलची वाट न पाहता आधी लसींचा साठा पुरवावा जेणेकरून महाराष्ट्रात सुरू असलेली लसीकरण मोहीम थांबणार नाही. मात्र त्या लसी वेळेत आल्या नाहीत तर महाराष्ट्रातील लसीकरण मोहिमेत एक आठवड्याचा खंड पडण्याची चिन्हं आहेत असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
17 लाख लसी केंद्राकडून देणार असल्याचं आत्ताच समजलं आहे, आपली मागणी 40 लाखांची आहे. दर आठवड्याला 40 लाख लसी देण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या राज्यात फक्त 9 लाख लसी आहेत. हा साठा जेमतेम दीड दिवस पुरेल इतकाच आहे असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
15 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत केंद्राने सात लाखांऐवजी 17 लाखांची संख्या केली आहे. मात्र ही लसींची संख्या कमी पडणार आहे. ज्या लसी दिल्या आहेत त्यासाठी मी धन्यवाद करेन मात्र लसींचा पुरवठा वाढवण्यात यावा असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
Corona वाढू लागल्याने महाराष्ट्राच्या जनतेला शरद पवारांचं कळकळीचं आवाहन, म्हणाले…
सगळ्या पद्धतीने केंद्राशी समन्वय केला जातो आहे. आम्ही रोज सहा लाख लसी देत आहोत हे पत्राद्वारे, फोनवरून व्हीसीमधून सांगितलं आहे. महिन्याला एक कोटी साठ लाख लसी द्यायला हव्यात ही मागणी आम्ही वारंवार केली आहे. ज्या लसी आहेत हे सांगितलं जातं आहे तो साठा दोन ते तीन दिवस पुरणारा आहे. या सगळ्या गोष्टी मी हर्षवर्धन यांना सांगितल्या. शरद पवार यांनीही त्यांना विनंती केली आहे, त्यांनी संपूर्ण सहकार्य देण्याची मागणी केली आहे. तरीही अशा प्रकारे का होतं आहे ते समजत नाही असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT