Corrupt Manus एकनाथ शिंदे : आदित्य ठाकरेंनी सांगितला CM शब्दाचा नवीन अर्थ

मुंबई तक

12 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 04:40 PM)

Aditya Thackeray News : मुंबई : आताचं सरकार सर्वसामान्यांचं नाही, तर कॉन्ट्रॅक्टरच सरकार आहे हे आधीपासून सांगतं आहे. मुंबईकरांचा प्रत्येक पावलावर पैसा वाचवतं ९० हजार कोटींच्या ठेवी बनविल्या. पण आता मुंबईकरांचा हा पैसा लुटायची सुरुवात झाली आहे. रस्त्यांच्या कामात मोठा घोटाळा झाला. मात्र काम रेटून नेत आहेत. पण हा मुंबईकरांचा पैसा आहे, असं म्हणतं सीएम […]

Mumbaitak
follow google news

Aditya Thackeray News :

हे वाचलं का?

मुंबई : आताचं सरकार सर्वसामान्यांचं नाही, तर कॉन्ट्रॅक्टरच सरकार आहे हे आधीपासून सांगतं आहे. मुंबईकरांचा प्रत्येक पावलावर पैसा वाचवतं ९० हजार कोटींच्या ठेवी बनविल्या. पण आता मुंबईकरांचा हा पैसा लुटायची सुरुवात झाली आहे. रस्त्यांच्या कामात मोठा घोटाळा झाला. मात्र काम रेटून नेत आहेत. पण हा मुंबईकरांचा पैसा आहे, असं म्हणतं सीएम म्हणजे करप्ट माणूस असा नवा अर्थ सांगतं शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknat Shinde) यांच्यावर हल्लाबोल केला. ते मुंबईतील गोरेगावमध्ये शिवगर्जना अभियान यात्रेत बोलत होते. (Aditya thackeray target shivsena and bjp leader in Goregaon public rally)

महाराष्ट्राच मुख्यमंत्री कार्यालयही दिल्लीतून चालवितात :

देसाई साहेब, मगाशी तुम्ही म्हणालात, महाराष्ट्रातून अनेक गोष्टी गुजरात, दिल्ली किंवा इतर राज्यात हलविल्या. यात आरबीआय, एअर इंडियाच ऑफिस, इंटरनॅशनल फायनान्स सेंटर असेल. यात सगळ्यात एक गोष्ट मात्र राहिली. ती म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय. महाराष्ट्राच मुख्यमंत्री कार्यालयही हल्ली दिल्लीतून चालविलं जातं आहे. हीच वेदना आणि हेच दुःख आहे.

EC म्हणजे Entirely Compromised : आदित्य ठाकरे

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. ते म्हणाले, मी शिवसेनाच म्हणणार, मी दुसरी शिवसेना मानतं नाही. हल्ली EC म्हणजे Election Commission राहिलं नसून ते आता Entirely Compromised झालं आहे. त्यामुळे कोणताही निर्णय दिला असला तरी तो लोकशाहीला घातक आहे.

बच्चू कडू खरं बोलले की खोटं? आसाममध्ये कुत्र्याचं मांस खातात का?

म्हणून महाराष्ट्रात निवडणुका झालेल्या नाहीत : आदित्य ठाकरे

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेली गद्दारी जनतेला मान्य नसल्याचं सांगितलं. ते म्हणाले, मी जिथं जातो तिथं लोकांचा आपल्याला पाठिंबा मिळत आहे. गद्दारांची गद्दारी लोकांना आवडलेली नाही. तुम्ही कोणताही सर्वे घ्या, हे सर्वे त्यांच्या विरोधात जात आहेत आणि हे त्यांनाही माहित आहे. त्यामुळेच निवडणुका झालेल्या नाहीत.

Sheetal Mhatre : व्हायरल व्हिडीओ प्रकरणात तीन जण ताब्यात; एक काँग्रेसशी संबंधित?

डबल इंजिन सरकारचं इंजिन फेल आणि भंगारातून काढलेलं :

आदित्य ठाकरे यांनी डबल इंजिन सरकार या केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार असलेल्या संकल्पनेवर जोरदार टीका केली. राज्य प्रगतीपथावर होतं. पण राज्यात १०० टक्के येणार प्रकल्प गुजरातला पाठविले, वेदांता-फॉक्सकॉन, एअर बस, ब्लक ड्रग पार्क असे डबल इंजिन सरकारमध्ये हक्काचे १ लाख रोजगार गमावले. हे डबल इंजिन सरकार म्हणजे इंजिन फेल आहे आणि ते भंगारातून काढलेलं आहे, अशी खोचक टीका केली.

    follow whatsapp