नवी दिल्ली: कोरोना व्हायरसच्या वाढत्या समस्येदरम्यान दिल्लीच्या एम्स रुग्णालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाची लागण तरुणांना अधिक होत असल्याचं दिसून आल्यानंतर या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये सौम्य आणि गंभीर लक्षणं आणि त्याच्या उपायांबद्दल माहिती देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
काय आहेत एम्सची नवीन मार्गदर्शक तत्त्वे:
सौम्य लक्षणे असलेले रुग्णः एम्सच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार एखाद्या व्यक्तीला कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यास त्याने घरीच आयसोलेट झालं पाहिजे. यादरम्यान त्याने लोकांपासून दूर राहावं, मास्क, सॅनिटायजर आणि स्वच्छता याबाबत काळजी घ्यावी. तसेच आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहावे. जर आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
अधिक लक्षणे दिसू लागल्यास: एखाद्या व्यक्तीचा त्रास वाढू लागल्यास, श्वास घेण्यास खूप अडचण येत असल्यास त्याला तात्काळ वॉर्डात दाखल करावे. रुग्णाला अधिक त्रास होऊ लागल्यास त्याला ऑक्सिजन मिळणं गरजेचं आहे. तसंच अशा रुग्णाच्या श्वासोच्छवासावर डॉक्टरांनी सतत लक्ष ठेवलं पाहिजे. जर स्थिती बिघडत असेल तर त्याची सिटी स्कॅन करणं आवश्यक आहे.
Zydus च्या कोरोनावरच्या Virafin औषधाला DCGI ची तातडीच्या वापरासाठी संमती
जर परिस्थिती अनियंत्रित होऊ लागली: एखाद्याची प्रकृती खूपच खालावली गेली असेल तर त्याला आयसीयूमध्ये भरती करा. रुग्णाची ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण केली पाहिजे आणि त्यानुसार उपचार केले पाहिजेत. रूग्णाला रक्ताशी संबंधित कोणतीही समस्या येऊ देऊ नका, किंवा त्याच्यावरील ताण वाढू देऊ नका. परिस्थिती बिकट झाल्यास इतरही चाचण्या करण्यात याव्यात.
या सर्वसाधारण मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त एम्स दिल्लीने गुरुवारी आणखी एक सूचना दिली आहे. एम्समध्ये संसाधनांच्या अभावामुळे आता केवळ त्या आरोग्यसेवांची तपासणी केली जाईल ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत. जर एखादा हेल्थवर्कर हा कोरोना पॉझिट असेल तर त्याला आयसोलेट केलं जाईल आणि त्यानुसार त्याच्यावर उपचार केले जातील.
महाराष्ट्राला Oxygen, Remdesivir आणि लसींचा पुरवठा वाढवा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी
राज्यात कोरोनाचे किती रुग्ण?
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात नवे 67 हजार 13 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर तब्बल 568 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 62 हजार 298 बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 33 लाख 30 हजार 747 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 81.34 टक्के झालं आहे. राज्यातील मृत्यू दर हा सध्या 1.53 टक्के इतका आहे. राज्यात आज घडीला 6 लाख 99 हजार 858 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
ADVERTISEMENT