ज्या लोकांना कुठेही थारा मिळत नाही ते अशी विधानं करतात, Raj Thackeray यांच्या वक्तव्याचा अजित पवारांकडून समाचार

मुंबई तक

• 11:05 AM • 21 Aug 2021

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून जाती-पातीचं राजकारण वाढीला लागलं असं वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांनी समाचार घेतला आहे. बारामती दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांना पत्रकारांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता अजित पवारांनी, शिळ्या कडीला उत आणण्याचं काम करु नका असं म्हटलं आहे. “मी या विषयावर कालच पुण्यात बोललो आहे. आता सारखं सारखं शिळ्या […]

Mumbaitak
follow google news

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून जाती-पातीचं राजकारण वाढीला लागलं असं वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांनी समाचार घेतला आहे. बारामती दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांना पत्रकारांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता अजित पवारांनी, शिळ्या कडीला उत आणण्याचं काम करु नका असं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

“मी या विषयावर कालच पुण्यात बोललो आहे. आता सारखं सारखं शिळ्या कडीला उत आणण्याचं काम करु नका. तो विषय आमच्या दृष्टीने संपलेला आहे. ज्या लोकांना कुठेही थारा मिळत नाही ती लोकं अशी विधानं करत असतात”, असं म्हणत राज ठाकरेचं नाव न घेता अजित पवारांनी टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना प्रबोधनकार ठाकरेंचं साहित्य वाचण्याचा सल्ला दिला होता. ज्याला प्रत्युत्तर देताना राज ठाकरेंनी मी प्रबोधनकारही वाचले आहेत आणि यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत असं म्हणत पवारांना टोला लगावला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही राज ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. “राज ठाकरे यांच्या मताशी मी सहमत नाही. हजारो वर्षांपासून आपल्या देशात जाती-पातीचा विषय आहे. शरद पवार यांनी कोणत्याही जातीवर अन्याय केला नाही, त्यांनी प्रत्येकाला न्याय दिला आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची भूमिकाही पवारांनीच घेतली होती.”

राज ठाकरेंकडून राष्ट्रवादी काँग्रेसला ‘बौद्धिक’ डोस, पाहा नेमकं काय म्हटलं..

राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करताना असं म्हटलं आहे की, “जिथे चिकित्सा-स्वातंत्र्य नाही, तिथे बौध्दिक विकास नाही… जिथे बौध्दिक विकासाला बंदी, तिथे राज्यकर्त्यांनी समाज-विकासावर मोठमोठी व्याख्याने देणे, म्हणजे बांडगुळानेच झाडाचं रक्त शोषणं होय!”

: प्रबोधनकार ठाकरे

‘माझी जीवनगाथा’ (पाने २८०-२८१)

    follow whatsapp