Ajit Pawar : “विश्वासघाताच्या पायावर उभं असलेलं सरकार विधीमान्य नाही”

मुंबई तक

16 Aug 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:53 AM)

राज्यात सत्ता हाती घेण्याच्या आधीपासून तसंच सत्ता हाती घेतल्यापासूनच सरकारच्या डोक्यावर सुप्रीम कोर्टाच्याकडून अपात्र ठरवलं जाण्याची टांगती तलवार कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेलं हे सरकार लोकशाहीच्या चिंधड्या उडवून विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेलं आहे. हे सरकार अजूनही विधीमान्य नाही असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर […]

Mumbaitak
follow google news

राज्यात सत्ता हाती घेण्याच्या आधीपासून तसंच सत्ता हाती घेतल्यापासूनच सरकारच्या डोक्यावर सुप्रीम कोर्टाच्याकडून अपात्र ठरवलं जाण्याची टांगती तलवार कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेलं हे सरकार लोकशाहीच्या चिंधड्या उडवून विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेलं आहे. हे सरकार अजूनही विधीमान्य नाही असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

हे वाचलं का?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

शिंदे फडणवीस सरकारची वैधता संदिग्ध आहे, त्यामुळेच या सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणं हे भारतीय संविधानाशी, महाराष्ट्र राज्याशी आणि राज्यातील जनतेच्या हिताशी प्रतारणा करणारं ठरेल असं सांगत सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला आहे. सरकारकडून विकास कामांना स्थगिती देण्यात आली आहे. राज्याच्या विकासाला खीळ घालण्याचं काम या सरकारकडून होतं आहे अशीही टीका अजित पवारांनी केला आहे.

विदर्भ, मराठवाडा, कोकणासह राज्यातील २८ जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीने हाहाकार माजला आहे. या सगळ्या स्थितीत १२५ पेक्षा जास्त लोकांना मृत्यू झाला आहे तरीही राज्य सरकारकडून म्हणावी तशी मदत मिळत नाही. राज्य सरकारने नागरिकांना कोणताही दिलासा दिलेला नाही अशीही टीका अजितदादांनी केली. १७ ऑगस्टपासून विधीमंडळाचं अधिवेशन सुरू होतं आहे. हे अधिवेशन वादळी होणार असेच संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.

दोन सदस्य असलेल्या मंत्रिमंडळाने ४० दिवसात ७५० निर्णय घेतले

दोन सदस्य असलेल्या मंत्रिमंडळाने ४० दिवसात ७५० निर्णय घेतले आहेत. उपमुख्यमंत्र्यांना बिनखात्याचं मंत्री ठेवण्यात आलं होतं. एकाच व्यक्तीने महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे निर्णय घेतले. राज्याचे निर्णय एकाच व्यक्तीने घेतल्याची कृती सामूहिक निर्णय प्रक्रियेचा छेद देणारी, लोकशाही व्यवस्था आणि नैतकतेचे धिंडवडे काढणारी आहे. शिंदे सरकारने सरकार स्थापन केल्यापासून शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, व्यापारी, उद्योजक, महिला, विद्यार्थी, युवक या समाज घटकांबद्दल असंवेदनशीलता दाखवली अशीही टीका अजित पवार यांनी केली.

संतोष बांगर यांच्यावर टीका

सत्ता येऊन काही दिवस आलेले असताना यांचे काही आमदार चुकीची भाषा वापरत आहेत. शिवसैनिकांचे हात तोडा, हात तोडता आले नाही तर तंगडी तोडा अशी भाषा वापरण्यात येते. हा सत्तेचा माज आहे. शाहू-फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात ही भाषा कशी काय वापरली जाते. ही भाषा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पटते का? कायदा हातात घेण्याची हिंमत कशी होते? सत्ता आली म्हणजे काय मस्ती आली का? असाही प्रश्न अजित पवारांनी विचारला.

    follow whatsapp