”बारामती काय अजित पवारच्या बापाची आहे का?”, दादा पत्रकारांवरती का भडकले?

मुंबई तक

03 Sep 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:48 AM)

श्रीगोंदा: श्रीगोंदामध्ये आज अजित पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधला आहे. ”बारामती काय अजित पवारच्या बापाची आहे का?” केंद्रीय मंत्री निर्मला सितारमन यांना बारातमी लोकसभेची जबाबदारी दिल्या नंतर पत्रकांरानी विचारलेले प्रश्नांवर बोलताना […]

Mumbaitak
follow google news

श्रीगोंदा: श्रीगोंदामध्ये आज अजित पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

”बारामती काय अजित पवारच्या बापाची आहे का?”

केंद्रीय मंत्री निर्मला सितारमन यांना बारातमी लोकसभेची जबाबदारी दिल्या नंतर पत्रकांरानी विचारलेले प्रश्नांवर बोलताना म्हणाले ”अमुक अमुक जण बारामतीला येणार आहेत, तुम्हचं काय म्हणनं आहे. येऊदे ना बारामतीला, बारामती काय अजित पवारच्या बापाची आहे का ? ती सर्वांची आहे. उद्या तुम्हाला ही वाटलं तर तुम्ही पण येणार ना आणि आलेल्यांचं स्वागत करणं ही आपली परंपरा आहे. त्यात वाईट वाटायचं काय कारण आहे. कोणी नेते महाराष्ट्रात आले येऊद्या त्यांचा अधिकार आहे. आम्ही कधी दुसऱ्या राज्यात गेलो तर ते म्हणतात का अजित पवार इकडे कशाला आले. म्हणुन पत्रकारांना माझी हात जोडुन विनंती आहे तुम्हाला काही दाखवायला नसेल तर असले काही दाखवू नका” असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांना खडसावलं आहे.

अजित पवार आपल्या भाषणात काय म्हणाले?

”कधी वाटलं नव्हतं आपल्याच मंत्रिमंडाळातील सहकारी नाराज होऊन काही आमदारांना घेऊन सुरतला जाईल, तिथनं गुहाटीला जाईल, गोव्याला जाईल मग असं काहीतरी घडेल. उद्धव ठाकरे म्हणाले राष्टवादी एकजुट राहिली, काँग्रेस एकजुट राहिली परंतु बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की माझा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे त्या करीता ते अहोरात्र झटत होते. त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री केल्यानंतर त्यांच्या जवळच्यांनी दगाफटका केला हे आपण पाहिलं” असं अजित पवार म्हणाले.

अजित पवारांची भाषणात वैचारिक फटकेबाजी

”राजकीय जीवनामधे काम करत असताना आपण ग्रामपंचायत लढवतो, आमदारकी, खासदारकी अशा अनेक निवडणुका लढवत असतो, पण एकदा पक्षाच्या चिन्हावर निवडूण आल्यानंतर पक्षाने एखादा निर्णय घेतला तर आपण समजू शकतो. परंतु, असे गट बाहेर पडायला लागले तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. देशाला 75 वर्ष पुर्ण झाले. म्हणुन आपण अमृतमहोत्सव साजरा करत आहोत, त्याच संविधानामुळे कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत एकजुट आहे. अनेक जातीची, रंगाची मानसं ही एकोप्यानी राहिली, कधी काही वाद झाला असेल परंतु गुण्यागोविंदानं राहिलो, विकास कामांना महत्व दिलं.” असं अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार म्हणाले 50 खोके बाकी सर्व ओके…

पुढे अजित पवार म्हणाले ”शेतकऱ्यांना ताठमानेने जगता यावं म्हणून काम केलं, मात्र हे सर्व करत असताना काही जणांनी काय प्रसंग आणला, सर्वाचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे, पण तारीख पर तारीख सुरू आहे. सर्वांना वाटतंय की निकाल काहीतरी द्यावा. हे महाराष्टात घडले म्हणुन मी बोलत नाही अशा पद्धतीनं तोडा फोडीचं राजकारण पुढे आलं त्यातुन वेगवेगळ्या घोषणा पुढे आल्या 50 खोके बाकी सर्व ओके.”

    follow whatsapp