अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी २४ लाखांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी २ फेब्रुवारीला तेल्हारा – आरसुड रस्त्यावर गस्त घालत होते. यावेळी आरोपींनी तक्रारदार शेख मुरादकडे १००० रुपयांची चिल्लर आहेत का अशी विचारणा केली. शेख मुराद यांच्याकडे त्यावेळेला चिल्लर होती, म्हणून त्यांनी आरोपींना चिल्लर दिले. आरोपींनी आपल्या खिशातल्या ५०० रुपयांच्या दोन नोटा शेख मुरादला दिल्या. थोड्या वेळाने शेख मुराद यांना या नोटा नकली असल्याचं लक्षात आलं. यावेळी त्यांनी तात्काळ तेल्हारा पोलिसांना याची माहिती दिली.
अमरावतीत तरूणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याचा धक्कादायक प्रकार, आरोपीला १० वर्षांची शिक्षा
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी गाठून आरोपींची विचारपूस केली असता, त्यांच्याकडे भारतीय चलनातल्या ५०० रुपयांच्या १०८ नोटा, लहान मुलांच्या खेळण्यातील नकली नोटा, एक चारचाकी वाहन आणि इतर मुद्देमाल सापडला. पोलिसांनी यावेळी आरोपी अमित कटारे, अमोल कटारे, चंदू घायाळ या आरोपींना अटक केली आहे. या घटनेतील चौथा आरोपी विजय ठाकूर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
बीड: खाकी वर्दीवर डाग? अप्पर पोलीस अधिक्षकांनी धाडीतले ४ लाख ५५ हजार हडप केल्याचा आरोप
ADVERTISEMENT