Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदे प्रकरणी पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल होणार? वकील काय म्हणाले?

Akshay Shinde Encounter Updates: अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल मुंबई हायकोर्टात सादर केला गेला आहे. या अहवालानुसार, पोलीस कर्मचारी ही परिस्थिती हाताळू शकले असते. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने हा अहवाल न्यायालयात वाचून दाखवला.

Mumbai Tak

मुंबई तक

24 Jan 2025 (अपडेटेड: 24 Jan 2025, 10:46 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अक्षय शिंदे प्रकरणात काय म्हणाले वकील?

point

अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी पोलीसच जबाबदार?

point

अक्षय शिंदेच्या कुटुंबावर राजकीय मंडळींचा दबाव?

Badlapur Case Updates: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा काही दिवसांपूर्वी 'एन्काऊंट' झाला होता. यावेळी पोलिसांनी आत्मसंरक्षणार्थ अक्षयवर गोळीबार केला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. मात्र आता न्यायालयाने या प्रकरणी महत्वाचं निरीक्षण नोंदवत या मृत्यूसाठी पोलीसच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. त्यानुसार आता अक्षय शिंदे यांचे वकील अमित कटारनवरे हे मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गेले होते. तसंच यावेळी त्यांनी इतर काही मुंद्द्यांवरुनही गंभीर आरोप केले आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Ulhasnagar Crime News : शेजारी राहणाऱ्या बाप-बेट्यांकडून चॉकलेटचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अक्षय शिंदेच्या (Akshay Shinde Case Updates) मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल मुंबई हायकोर्टात सादर केला गेला आहे. या अहवालानुसार, पोलीस कर्मचारी ही परिस्थिती हाताळू शकले असते. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने हा अहवाल न्यायालयात वाचून दाखवला. दरम्यान, अक्षय शिंदेंचा एन्काउंटर संशयास्पद असून याला पाच पोलीस जबाबदार असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. वकील अमित कटारनवरे हे पोलीस वरीष्ठ  अधिकारी अनिल शिंदे यांच्याशी बोलत असताना म्हणाले, ही हत्या आहे राजकीय फायद्यासाठी ही हत्या आहे. पिस्टल वर अक्षय शिंदे चे हाताचे ठसे नाहीत. संजय शिंदे यांनी बुलेट फायर केले.  अक्षय शिंदेच्या शरिरावर आणि शर्टवर फायर झालेल्या बुलेटचे गण पावडर नाही. 
अक्षय शिंदे यांच्या वडिलांना धमकी चे फोन येत आहेत. राजकीय नेते त्रास देण्याचं काम करत आहेत असं वकील म्हणाले. 

अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणी कारवाईची मागणी करत वकील म्हणाले, 5 पोलिसांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. संविधानिक आणि न्यायालयाच्या अनुषंगाने या प्रकरणी गुन्हा दाखल करावा. घरातील लोकांच्या वर उपासमारीची वेळ आलेली आहे. बँकेकडून घर जप्ती करण्यात आलेली आहे, त्यामुळे घरच्यांना न्याय मिळण्यावा ही विनंती असल्याचं वकील म्हणाले.

हे ही वाचा >> Eknath Shinde : "...तर आपल्या सर्वांची पाठ बाळासाहेबांनी थोपटली असती", उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले

दरम्यान, न्यायालयाने याप्रकरणी पोलिसांवरच ठपका ठेवला असून, पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश दिले आहेत. अक्षय शिंदेचे (Akshay Shinde) वकील अमित कटारनवरे हे  मुंब्रा पोलिसांना ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पोहोचले होते. 
ठाणे गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, मुख्य हवालदार अभिजीत मोरे, हवालदार हरीश तावडे आणि पोलीस वाहन चालक अशा पाच जणांच्या पथकावर न्यायालयीन चौकशीमध्ये ठपका ठेवण्यात आला होता.  उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यासाठी अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरे  मुंब्रा पोलीस स्थानकात पोहोचले होते. राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल आणि गुन्हा देखील दाखल करतील असं मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर  यांनी सांगितलं.

    follow whatsapp