मुंबई: ठाण्यातील शिवसेना (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) हे मागील काही दिवसांपासून ईडीच्या (ED) रडारवर आले आहेत. त्यामुळे ते अचानक विजनवासात गेले होते. पण आज (20 जून) त्यांनी एक लेटरबॉम्ब (Letter Bomb) शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टाकला आहे.
ADVERTISEMENT
प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्रात थेट म्हटलं आहे की, ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे आपलाच पक्ष कमकुवत करत असतील तर आपण पुन्हा एकदा भाजपशी जुळवून घेतलेले बरे होईल.’
ठाण्यातील हेविवेट आमदार म्हणून ओळखले जाणारे प्रताप सरनाईक यांच्या अशा स्वरुपाच्या पत्रामुळे संपूर्ण शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. यावेळी प्रताप सरनाईक यांनी पत्रात सरळसरळ असं म्हटलं आहे की, आपण राज्यात भाजपची साथ सोडल्यामुळेच आपल्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे.
‘कोणताही गुन्हा नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरु आहे. पण आपल्या एका निर्णयामुळे हे सगळं कुठेतरी थांबू शकेल.’ असं थेट आवाहन प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना केलं आहे.
प्रताप सरनाईक यांनी 9 जून रोजी हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलं होतं. त्यानंतर जवळजवळ 10 दिवसांनी हे पत्र आता समोर आलं आहे. या दोन पानी पत्रामध्ये सरनाईक यांनी थेट भाजपबरोबर जाण्याचं उद्धव ठाकरेंना आवाहन केलं आहे.
Shiv Sena vs BJP: शिवसैनिकांनी भाजपला प्रसाद दिला आहे, शिवभोजनाची वेळ येऊ देऊ नका: संजय राऊत
प्रताप सरनाईक यांची ईडी चौकशी सुरु झाल्यापासून ते जवळजवळ अज्ञातवासात गेले होते. पण आता सरनाईक यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, ‘मुंबई, ठाणे व अन्य पालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य पालिकांच्या निवडणुका आहेत.’
‘आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे होईल. त्याचा फायदा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आणि भविष्यात शिवसेनेला होईल.’ असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला सरकार सोडून भाजपसोबत जाणाचा जवळजवळ सल्लाच दिला आहे.
शिवसेना भवनासमोर Shivsena आणि BJP कार्यकर्त्यांचा राडा
‘शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविण्याचा तुम्ही शब्द दिला होता. तो पूर्ण करून दाखवला. तुम्ही पदाला न्यायही देत आहात. पण या परिस्थितीही राजकारण सुरू आहे. सत्तेत राहूनही काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते फोडत आहे. आपला पक्ष कमकुवत करत असेल तर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेतलेले बरे. हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे निदान प्रताप सरनाईक. अनिल परब आणि रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास थांबेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.’ असंही प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
ADVERTISEMENT