देशात कोरोनाने कहर माजवलाय. रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. अशातच बेड्स तसंच ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्याचं चित्र आहे. देशातील सध्याच्या परिस्थितीमुळे लोकं पुरते वैतागले आहेत. मात्र या कठीण प्रसंगाला धीराने आणि खंबीरपणे तोंड देत कोरोना वॉरियर्सचं मनोबल उंचवूया असं बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी लोकांना आवाहन केलं आहे.
ADVERTISEMENT
कोरोनाच्या कठीण परिस्थितीत अमिताभ बच्चन यांनी आर्थिक मदत दिली आहे. तर आता देशातील कोरोना वॉरियर्सचं मनोबल वाढवण्यासाठी देखील बीग बी यांनी पुढाकार घेतलाय. अमिताभ यांनी नागरिकांनी हार न मानता या संकटाशी एकत्रितपणे येऊन लढलं पाहिजे, असं म्हटलंय.
यासंदर्भात अमिताभ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडियोमध्ये पूर्ण जोशात प्रसून जोशी यांची कविता ‘रुके ना तू’ सादर केली आहे. या कवितेद्वारे ते लोकांना एकजूट होण्यासाठी प्रेरित करत आहेत. अमिताभ यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
ही कविता सादर केल्यानंतर अमिताभ पुढे म्हणतात, सध्याच्या परिस्थितीसाठी ही कविता अचूक बसते. ही देशातील सर्व कोरोना वॉरियर्स आणि फ्रंटलाइन कामगारांचं मनोबल वाढविण्यासाठी आहे. आमच्या सुरक्षिततेसाठी ते प्रत्येक गोष्ट सॅक्रिफाइज करत आहेत. आता त्यांचं मनोबल वाढवणं आवश्यक आहे. हा आमचा लढा आहे, आपण सर्वांनी एकत्रित येऊन योगदान दिलं पाहिजे. आपण सर्वांनी भारताच्या कल्याणासाठी एक असलं पाहिजे.”
ADVERTISEMENT